घरमहाराष्ट्रपुण्यातील प्रसिद्ध SP’s बिर्यानीमध्ये अळ्या

पुण्यातील प्रसिद्ध SP’s बिर्यानीमध्ये अळ्या

Subscribe

पुण्यातील एसपीज या प्रसिद्ध बिर्यानी हॉटेलमधील बिर्यानीमध्ये अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यासंदर्भातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुण्यातील जहांगीर रुग्णालयात रुग्णाला दिलेल्या सूपामध्ये चक्क रक्ताने माकलेल्या कापसाचा बोळा सापडल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एक धक्कादायक प्रकरा समोर आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध एसपीज बिर्यानी हाऊसच्या बिर्यानीमध्ये चक्क अळ्या आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ग्राहकाने हॉटेल प्रशासनाकडे तक्रार केली असता त्यांना उद्घटपणे उत्तरे देण्यात आली असून तुम्हाला काय करायचे ते करा, अशी उलटी ग्राहकाला दमदाटी करण्यात आली.

नेमके काय घडले?

पुण्यातील एसपीज बिर्यानी हे हॉटेल बिर्यानी करिता अतिशय प्रसिद्ध असे हॉटेल आहे. रविवारी दुपारी एसपीज बिर्यानी हॉटेलमध्ये ग्राहक विरेंद्र ठाकूर हे आपल्यासोबत बिर्यानी खाण्यासाठी गेले होते. ते बिर्यानी खात असताना त्यांना बिर्यानीमध्ये अळया आढळल्या.बिर्यानीमध्ये अळया दिसताच त्यांनी याबाबतची माहिती लगेच वेटरला दिली. त्यानंतर ग्राहक ठाकूर यांनी मॅनेजरला याबाबत विचारणा केली. तसेच याबाबत तक्राक देकील केली जाईल, असे देखील सांगितले. मात्र हॉटेलच्या मॅनेजरने तुम्हाला काय करायचे ते करा अशा शब्दात त्यांना उत्तर दिले. या दरम्यान या प्रसंगाचा व्हिडिओ काढण्यात आला असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

- Advertisement -

माझ्याविरोधात षड्यंत्र

पुण्यातील एसपीज बिर्यानी हॉटेला २५ वर्ष पूर्ण झाली आहे. आजवर प्रत्येकाला चांगली सेवा देण्यात आली आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा प्रकार पाहता माझ्या विरोधात कोणतरी षड्यंत्र रचल्याची प्रतिक्रिया हॉटेलच्या मालकांनी दिली आहे.


वाचा – धक्कादायक! रुग्णाला दिलेल्या सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -