घरमुंबईभिवंडीत ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाच्या खडी आणि डांबराने रस्त्यांची दुरुस्ती

भिवंडीत ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाच्या खडी आणि डांबराने रस्त्यांची दुरुस्ती

Subscribe

भिवंडी शहर महानगपालिका क्षेत्रातील खड्डेमय रस्ते बुजवण्यासाठी खासगी ठेकेदारामार्फत डांबरीकरणाचे काम पालिकेच्या बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. मात्र ठेकेदार निकृष्ट दर्जाची खडी, डांबर वापरून रस्ते दुरुस्ती करीत असल्याचे समोर आले आहे.

भिवंडी शहर महानगपालिका क्षेत्रातील खड्डेमय रस्ते बुजवण्यासाठी खासगी ठेकेदारामार्फत डांबरीकरणाचे काम पालिकेच्या बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. मात्र ठेकेदार निकृष्ट दर्जाची खडी, डांबर वापरून रस्ते दुरुस्ती करीत असल्याने पहिल्या पावसातच हे रस्ते वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी शहरातील विविध भागात डांबरीकरण करून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची शासन मान्यता प्राप्त असलेल्या आयआयटी मार्फत तपासणी करूनच ठेकेदारांचे देयक अदा करावे अशी मागणी शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या ठिकाणच्या रस्त्याची करण्यात येत आहे दुरुस्ती

भिवंडी शहरातील प्रभाग समिती क्र.१ ते ५ मधील बहुतांश अंतर्गत रस्ते गेल्या तीन महिन्यांपासून नादुरुस्त झालेले आहेत.त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेच्या महासभेत १५ कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पालिकेच्या बांधकाम विभागाने खासगी ठेकेदारामार्फत शहरातील जुना ठाणा रोड, बंदर मोहल्ला, दर्गा रोड, शांतीनगर, गैबी नगर, कल्याणरोड, ब्राम्हणआळी, कुंभारआळी, बंगालपुरा, सौदागर मोहल्ला, बाजारपेठ, तीनबत्ती , मानसरोवर रोआदी ठिकाणच्या खराब झालेल्या रस्त्यांवर पॅच वर्क आणि डांबरीकरण करूदुरुस्तीचे काम पालिका प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. मात्र सदरचे काम अत्यंत तकलादू आणि निकृष्ट दर्जाचे होत असल्याने रात्रीच्या वेळी दुरुस्त केलेला रस्ता दुसऱ्याच दिवशी उधळून पुन्हा नादुरुस्त होत आहे.

- Advertisement -

सदरचे रस्ते दुरुस्त करीत असताना कामाच्या ठिकाणी बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता अथवा प्रभाग अधिकारी आदींनी घटनास्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. याबाबतचे आदेश आयुक्त मनोहर हिरे यांनी लेखी दिलेले आहेत. मात्र स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि ठेकेदाराचे हित जोपासण्यासाठी सदरचे अधिकारी रस्ता दुरुस्ती कामाच्या ठिकाणी अनुपस्थित राहत आहेत. ही संधी साधून ठेकेदार रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची करीत आहे. नाममात्र डांबरात निकृष्ट खडीसोबत वाहनांमधील जळालेले काळे ऑइल वापरून रस्ते तयार केले जात आहेत. त्यातच काही दिवसातच पावसाचे आगमन होणार आहे. त्यामुळे निकृष्टपणे तयार करण्यात आलेले रस्ते हे वाहून जाण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. रस्ते निकृष्ट तयार केलेले असल्यामुळे ठेकेदार बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची बिले काढण्याची घाई करत आहेत. त्यासाठी पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी शहरातील निकृष्ट दर्जाचे तयार केलेल्या रस्त्यांची आयआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी शिवसेना आमदार शांताराम मोरे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -