घरताज्या घडामोडीपगारा अभावी नैराश्यातून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, संघटनांचा आंदोलनाचा पवित्रा

पगारा अभावी नैराश्यातून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, संघटनांचा आंदोलनाचा पवित्रा

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांच्या ड्यूटीची वेळ संपल्यानंतर ही निदर्शने करण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

वेळेवर पगार न मिळाल्याने एका एसटी कर्मचाऱ्यांने नैराश्यात येऊन आत्महत्या केली आहे. (ST employee commits suicide) साक्री येथील एसटी चालक कमलेश बेडसे (Kamlesh Bedase) यांच्या आत्महत्येनंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एसटी कर्मचऱ्यांचा आत्महत्येनंतर संघर्ष एसटी कामगार युनियन संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, जुलै महिन्याचा पगार तात्काळ देण्यासाठी एसटी कर्मचारी आज सोमवारी आगाराबाहेर आंदोलन करणार आहेत. दारिद्र आणि गरिबीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप संघटनेचे कार्यध्यक्ष जगनारायण कहार यांनी केला आहे. कोरोना काळात गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा गंभीर प्रश्न समोर उभा राहिला आहे. अनेक महिने वेळेवर पगार न मिळाल्याने आर्थिक तसेच मानसिक नुकसानाला समोरे जावे लागत आहे.

आज राज्य एसटी महामंडाळाच्या विरोधात राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराबाहेर झेंडे आणि बावटे बाजूला ठेवून कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन संघर्ष एसटी कामगार युनियनकडून करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या ड्यूटीची वेळ संपल्यानंतर ही निदर्शने करण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

एसटी कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्यातील पगार त्यांना अद्याप देण्यात आलेला नाही. ऑगस्ट महिन्यातील पगार वेळेवर मिळावा यासाठी संघर्ष एसटी कामगार युनियनने औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यावर १४ ऑगस्ट २०२१ रोजी एसटी कामगारांच्या बाजूने निकाल लावून त्यांना लवकरात लवकर पगार देण्याचे आदेश देण्यात आले.


हेही वाचा – ईडीच्या नोटीसवर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ही अपेक्षा…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -