घरताज्या घडामोडीलिफ्टमध्ये सहकाऱ्याचा मृत्यू; ST महामंडळाचे कर्मचारी लिफ्ट सोडून जिने वापरतायत

लिफ्टमध्ये सहकाऱ्याचा मृत्यू; ST महामंडळाचे कर्मचारी लिफ्ट सोडून जिने वापरतायत

Subscribe

एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या लिफ्ट दुर्घटनेत महामंडळातील वीजतंत्री रामानंद पाटकर यांचा दुर्दवी मृत्यू झाला होता. मात्र या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात सर्वच कर्मचारी आणि अधिकारी गेल्या आठवडाभरापासून लिफ्ट ऐवजी जिन्यांचा वापर करताना दिसत आहेत.

एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या इमारतीमध्ये २७ डिसेंबर २०१९ ला झालेल्या लिफ्ट दुर्घटनेत संजय उर्फ रामानंद पाटकर या महामंडळाच्या वीजतंत्री कामगाराचा हकनाक बळी गेला. त्यांनतर एसटी महामंडळाने या घटनेची चौकशीसाठी सुरक्षा विभागाने एक समिती नेमली होती. या समीतीने पाटकर यांचा मृत्यू लिफ्टने प्रवास करताना दरवाजात अडकून झाल्याची माहिती दिली आहे. मात्र अद्याप नागपाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याने महामंडळाने अंतिम निष्कर्ष काढलेला नसल्याचेही संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

- Advertisement -

मात्र एसटीचा अहवाल सादर करताच एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयात काम करणार्‍या कर्मचारी आणि अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची धास्ती घेतलेले कर्मचारी आणि अधिकारी गेल्या आठवडाभरापासून लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर करताना दिसून येत आहेत. तर काही कर्मचार्‍यांनी दैनिक आपलं महानगरशी बोलताना सांगितले की, या लिफ्ट दुर्घटनेची आठवण येते म्हणून प्रवास करत नाही.

काय दिला अहवाल

दुर्घटनेवेळी पाटकर कोणत्याही प्रकारचे काम करत नव्हते, असे प्रत्यक्षदर्शीने चौकशीत सांगितले आहे. चौथ्या मजल्यावरील कॅन्टीनमध्ये जेवण केल्यानंतर पाटकर दुसर्‍या मजल्यावरील कार्यालयाकडे निघाले होते. मात्र याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. लिफ्टच्या दरवाजात पाटकर अडकले आणि त्यांना जीव गमवावा लागला, असा अहवाल सुरक्षा विभागाने महांडळाकडे सादर केल्याची माहिती महामंडळातील एका वरिष्ठ अधिकार्याने नाव न छापण्याचा अटिवर दैनिक आपलं महानगरला दिली आहे.

- Advertisement -

लिफ्टचा ढाचा जूना

एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाची इमारत ५० वर्षांपेक्षा जुनी आहे. त्यामुळे लिफ्टचा ढाचा सुद्धा तेवढाच जुना आहे. अशातच आता लिफ्टमध्ये अडकून कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याने, कर्मचार्‍यांनी धास्ती घेतली आहे. या इमारतीमध्ये चार लिफ्ट असतांना, कर्मचारी आता, लिफ्ट पेक्षा पायर्‍यानेच प्रवास केलेला बरा असे म्हणत आहे. इतकेच नव्हे तर या मध्यवर्ती इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरासुध्दा नाही. त्यामुळे मुख्यालयातील कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -