घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणावर राज्य सरकार तोंड बंद करून बसलंय - नरेंद्र पाटील

मराठा आरक्षणावर राज्य सरकार तोंड बंद करून बसलंय – नरेंद्र पाटील

Subscribe

राज्य सरकार मधील लोक मराठा समाजाबद्दल एक शब्द हि बोलायला तयार नाहीत

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी २०२१– २०२२ सालंकारिता केवळ साडे बारा कोटी रुपये देण्याचे नमूद करुन राज्यात असलेल्या महविकास आघाडी सरकारने मराठा समाजा बद्दल आस्था नसल्याचे दाखून दिले. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी साडे बारा कोटी रुपये ०१ सप्टेंबरला वर्ग करत असल्याचं मला एक परिपत्रक मिळालं आहे अस नरेंद्र पाटील कराड येथे बोलत असताना म्हणाले.

राज्यभरातील ३० हजार युवा उद्योजकांना सदर योजनेतून २०० कोटी रुपयांचे कर्ज वाटण्यात आले आहे . दर महा ८ कोटी रुपये, तर दरसाली ९६ कोटी रुपयांचे व्याज परत केले जाते या योजनेसाठी महाविकास आघाडी सरकार कडून फक्त साडे बारा कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे युवा उद्योजक अडचणीत येणार आहेत. राज्य सरकारमध्ये जे लोक सत्तेवर बसलेले आहेत ते काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का? राज्य सरकार मधील लोक मराठा समाजाबद्दल एक शब्द हि बोलायला तयार नाहीत अस नरेंद पाटील यांनी बोलताना म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -