घरमहाराष्ट्रपुणेसासवड ते जेजुरी एसटी बसचे स्टेअरिंग महिलेच्या हाती, पाहा व्हिडीओ

सासवड ते जेजुरी एसटी बसचे स्टेअरिंग महिलेच्या हाती, पाहा व्हिडीओ

Subscribe

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इतिहासामध्ये पहिल्यांदा एका महिलेने सासवड ते नीरा मार्गावर बस चालवत आपल्या नावाची नोंद केली आहे. अर्चना अत्राम असे या महिलेचे नाव असून या चालक महिलेने पहिल्यांदाच बसचे स्टेअरिंग हातात घेत प्रवाशांना सुरक्षितपणे आपल्या थांब्यावर पोहोचविण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

आजच्या महिला या कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. त्यामुळे सर्वच क्षेत्रात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. आता पुन्हा एकदा एका महिलेच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इतिहासामध्ये पहिल्यांदा एका महिलेने सासवड ते नीरा मार्गावर बस चालवत आपल्या नावाची नोंद केली आहे. अर्चना अत्राम असे या महिलेचे नाव असून या चालक महिलेने पहिल्यांदाच बसचे स्टेअरिंग हातात घेत प्रवाशांना सुरक्षितपणे आपल्या थांब्यावर पोहोचविण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. अर्चना अत्राम या काही पहिल्याच एसटी बस चालक नाहीत, पण या मार्गावर एसटी बस चालवणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत.

हेही वाचा – Cruise Drugs Case : समीर वानखेडेंचा मोठा दावा; आर्यनला क्लीन चिट देण्यासाठी एसआयटी स्थापन

- Advertisement -

गुरुवारी (ता. 08 जून) सायंकाळी साडेसहा वाजता अर्चना अत्राम या सासवड डेपोतून निरासाठी बस घेऊन निघाल्या. पण त्यावेळी मात्र अनेक प्रवासी अर्चना यांना चालकाच्या सीटवर पाहून अव्वाक झाले. यानंतर अनेकांना त्यांचा व्हिडीओ काढण्याचा मोह आवारता आला नाही. ज्यानंतर अर्चना यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

- Advertisement -

अर्चना यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येऊ लागले. इतकेच नाही तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरला शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत लिहिले आहे की, नवी जबाबदारी तुझी, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची…
आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एसटीच्या इतिहासात राज्यातील पहिल्या महिला एसटी चालक मा.अर्चना अत्राम यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला आहे. त्यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे ) या मार्गे बस चालवली आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने पहिल्या एसटी महिला चालक मा.अर्चना आत्राम यांचे मनःपूर्वक अभिनंदन..! #नारी_शक्ती #महिला #एसटी #चालक

मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना अत्राम या गेल्या दीड वर्षांपासून एसटी बस चालवण्याचे प्रशिक्षण घेत होत्या. पण पहिल्यांदाच ज्यावेळी त्यांनी एसटीचे स्टेअरिंग हातात घेतले. त्यावेळी त्यांनी मात्र उत्तम बस चालविली. नुकतेचं 3 जून रोजी एसटी महामंडाळाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. राज्यभरात एसटी कामगारांनी हा वर्धापन दिन जल्लोषात साजरा केला. त्यानंतर काही दिवसांतच एसटी महामंडळाकडून घेण्यात आल्याचे या निर्णयाचे देखील सगळ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.

एसटी महामंडळाने दीड ते दोन वर्षांपूर्वी महिला चालकांची भरती केली होती. यात सुमारे 30 ते 40 महिला चालकांची भरती करण्याचे नियोजन होते. त्यातील आणखी 17 महिला चालक या लवकरच पुणे विभागात रुजू होणार आहेत. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -