घरदेश-विदेशनिर्मला सीतारामन यांच्या मुलीचे लग्न साधेपणाने; राजकीय नेत्यांना निमंत्रण नाही

निर्मला सीतारामन यांच्या मुलीचे लग्न साधेपणाने; राजकीय नेत्यांना निमंत्रण नाही

Subscribe

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांची मुलगी परकला वांगमयी (Parakala Wangmayi) हिचे लग्न गुरुवारी अत्यंत साधेपणाने झाले. बंगळुरू येथील त्यांच्या घरी लग्नाचे सर्व विधी पार पडले. या लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि खास मित्रमंडळ उपस्थित होते. राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते.

निर्मला सीतारामन यांच्या मुलीचा विवाह ब्राह्मण परंपरेनुसार झाला. या विवाहाला उडुपी अदमारू मठाचे संत उपस्थित होते. परकलाने लग्नासाठी गुलाबी परिधान केली होती, तर प्रतीकने पांढरा पंचा आणि शाल परिधान केला होता. सीतारामन यांनी मोलाकलमुरू साडी नेसली होती. अर्थमंत्र्यांच्या मुलीच्या लग्नाचा फोटोसह या लग्नाचे व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात शेअर होत आहेत. व्हिडिओमध्ये एक साधा सोहळा दिसत असून वैदिक मंत्रोच्चार ऐकू येतो. (Nirmala Sitharaman’s daughter’s wedding simply; Political leaders are not invited)

- Advertisement -

सीतारामन यांची मुलगी पत्रकार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुलगी परकला वांगमयी ही व्यवसायाने पत्रकार आहे. वांगमयी हिने मॅसॅच्युसेट्समधील बोस्टन येथील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून पत्रकारितेत मास्टर ऑफ सायन्स केले आहे. याशिवाय तिने दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात बीएम आणि एमए केले आहे. तिने ‘द हिंदू’, ‘लाइव्ह मिंट’ आणि ‘द व्हॉईस ऑफ फॅशन’ या मीडिया कंपन्यांमध्ये काम केले आहे.

- Advertisement -

सीतारामन यांचे जावई पीएमओ ऑफीसमध्ये कामाला
सीतारामन यांचे जावई प्रतीक दोशी हे गुजरातचे रहिवासी आहेत. ते पीएमओ ऑफीसमध्ये ओएसडी आहेत. ते 2014 पासून पीएमओमध्ये कार्यरत आहेत. त्यांना 2019 मध्ये सहसचिव पद देताना ओएसडी बनवण्यात आले. ते संशोधन आणि रणनीतीचे काम पाहतात. प्रतीक सिंगापूर मॅनेजमेंट स्कूलचा पदवीधर आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना प्रतीक त्यांच्या कार्यालयात संशोधन सहाय्यक होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -