घरताज्या घडामोडीनवे पालकमंत्री मिळेपर्यंत विकासकामे थांबवा, जिल्हा नियोजन विभागाचा फतवा

नवे पालकमंत्री मिळेपर्यंत विकासकामे थांबवा, जिल्हा नियोजन विभागाचा फतवा

Subscribe

जळगाव महापालिकेला (Jalgaon Municipal Corporation) आगामी वर्षासाठी नियोजन विभागातर्फे मंजूर करण्यात आलेल्या निधीची कामे थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्याला नवे पालकमंत्री मिळाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येतील, असं जिल्हा नियोजन विभागाने महापालिकेला पत्राद्वारे सांगितलं आहे. त्यामुळे नवे पालकमंत्री मिळेपर्यंत महापालिकेसह विविध यंत्रणांना नवी कामं करता येणार नाहीत.

नियोजन विभागाने पाठवलेलं पत्र जळगाव महापालिकेला प्राप्त झालं आहे. त्यामुळे या पत्रानुसार, शहरातील काही विकासकामे थांबली आहेत. त्यामुळे नव्या पालकमंत्र्याची प्रतिक्षा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – प्रवीण राऊतांना दिल्लीला नेण्यास परवानगी; संजय राऊतांच्या अडचणी वाढणार

राज्यात शिंदे-फडणवीस यांचं महायुतीचं सरकार स्थापन होऊन महिना होत आला. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे सर्वच राज्य पालकमंत्र्यांशिवाय आहेत. राज्यातील राजकीय नाट्यामुळे ग्रामीण भागाला फटका बसत आहे. अनेक विकासकामे खोळंबल्याने जिल्ह्यातील पालकमंत्री निवडीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

जिल्हा नियोजन मंडळाकडून विविध विकासकामांसाठी निधी मिळत असतो. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन मंडळाकडून विविध विकासकामांसाठी निधी मंजूर केला जातो. त्यानुसार, जळगाव शहराच्या विकासाकामासाठी तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून ही कामे केली जाणार होती, मात्र आता दुसरे पालकमंत्री मिळत नाहीत तोवर ही कामे रखडली जाणार आहेत.

हेही वाचा – शिंदे समर्थक खासदारांच्या जाहिराती ‘सामना’ने नाकारल्या, राहुल शेवाळे म्हणतात…

नियोजन मंडळाचे पत्र

२०२२-२३ साठी जिल्हा नियोजन मंडळाकडून विकासकामांसाठी जो निधी देण्यात आला आहे त्यातील कामे करू नयेत. नवीन पालकमंत्री येईपर्यंत ही कामे करू नयेत, असे पत्र महापालिकेला पाठवण्यात आलं आहे. महापालिकेचे नगरोत्थान निधी व दलित वस्ती सुधार निधी अशा दोन निधीतून साधारणत: दहा ते बारा कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यामुळे आता या निधीतून महापालिकेची कामे थांबणार आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -