घरताज्या घडामोडीशिवसैनिकांचा अपमान झाला म्हणून शिवसेना सोडली, सुभाष साबणेंनी सांगितले कारण

शिवसैनिकांचा अपमान झाला म्हणून शिवसेना सोडली, सुभाष साबणेंनी सांगितले कारण

Subscribe

नांदेडमधील शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी शिवसेनेला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने त्यांना देवलूर विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीत ते काँग्रेस उमेदवाराविरुद्ध लढतील. शिवसेनेत आता शिवसैनिकांचा मानसन्मान राहिला नाही. त्यांचा अपमान झाला. त्यामुळे आपण शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला, असे सुभाष साबणे यांनी डोळ्यात अश्रू आणत सांगितले.
सुभाष साबणे म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानाला देखील काळे झेंडे दाखवले जातात. मात्र, नांदेडमधील बिलोली तालुक्यात काळे झेंडे दाखवले म्हणून पोलिसांनी शिवसैनिकांना बुटासह तुडवले. शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही हा प्रकार घडला. मला वाईट वाटले. म्हणून मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. 1984 पासून मी शिवसैनिक आहे. ज्या दिवशी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अटक होणार होती त्या दिवशी आम्ही विधानसभेत मोडतोड केली होती. त्यामुळे एक वर्षासाठी आम्ही निलंबित झालो. ते दिवसही आम्ही पाहिले.

मी आजही शिवसैनिक आहे. 4 ऑक्टोबरनंतर जो काही निर्णय आहे तो होईल. माझ्या शिवसैनिकांचा अपमान झाला. पोलिसांनी बुटासह तुडवले. अशोक चव्हाण यांनी बॅनरवर माझ्या नेत्याचा कधीच फोटो छापला नव्हता. बॅनरवर महाविकासआघाडीच्या नेत्यांचे फोटो राहावेत. माझ्या मतदारसंघात येताना महाविकासआघाडीचे नेते म्हणून आघाडीतील घटक पक्षाला सोबत घेऊन आले पाहिजे. तुम्ही पक्षाचा कार्यक्रम राबवायला नको हीच आमची भूमिका होती. त्यामुळेच आम्ही काळे झेंडे दाखवत होतो. तर पोलिसांनी पकडून बुटासह कार्यकर्त्यांना मारले, असे सुभाष साबणे यांनी सांगितले.

- Advertisement -

शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही शिवसैनिकांवर झालेल्या कारवाईवर सुभाष साबणे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, शिवसेनेच्या चांगल्या वाईट दिवसांमध्ये आम्ही शिवसेनेसोबत होतो; पण आज मुख्यमंत्री आमचे आहेत, तरी आमच्या कार्यकर्त्यांना बुटासह मारले जाते. याचे वाईट वाटले, खंत वाटली. माझ्या पक्षाच्या कोणत्याही नेत्यावर माझी नाराजी नाही. फक्त नांदेड जिल्ह्याचे जे नेतृत्व आहे त्या अशोक चव्हाण यांना आमचा विरोध आहे.
नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा कोविडनंतर १० एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा पक्षप्रवेश होण्याआधीच त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी हा झटका मानला जातोय.


हेही वाचा : अशोक चव्हाणांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून शिवसेना सोडली, सुभाष साबणेंचा आरोप 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -