घरताज्या घडामोडीSuchitra Bandekar : 'आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच, कारण 'पैशाचा'..., सुचित्रा बांदेकरांचं मोठं वक्तव्य

Suchitra Bandekar : ‘आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच, कारण ‘पैशाचा’…, सुचित्रा बांदेकरांचं मोठं वक्तव्य

Subscribe

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते आदेश बांदेकर हे चित्रपट, मालिका याव्यतिरिक्त राजकारणातही सक्रिय असतात. आदेश बांदेकर हे ठाकरे गटाचे सदस्य आणि सचिव आहेत. राजकीय भूमिकांमुळे ते नेहमी चर्चेत असतात. परंतु आदेश बांदेकर यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राजकारणाविषयी भाष्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

सुचित्रा बांदेकर यांनी अनेक वर्ष विविध प्रकारच्या भूमिका साकारत चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. हा चित्रपट आज प्रदर्शित झाला असून या चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. मागील अनेक दिवस त्यांची संपूर्ण टीम चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यग्र होती. तसेच त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजकारणाविषयी भाष्य केलं.

- Advertisement -

शिवसेनेत दोन गट पडले तेव्हा तुमच्या घरी चर्चा व्हायची का? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर सुचित्रा बांदेकर म्हणाल्या की, आम्ही सुरूवातीपासूनच घरात कधीही राजकारण आणलं नाही. आदेश त्या सर्व गोष्टी खूप मनापासून करतात. यामधून त्यांना एका पैशाचाही स्वार्थ नाही आणि आमची यामधून कोणत्याही फायद्याची अपेक्षा नाही. त्यामुळे घरात तो विषय होत नाही. पण खऱ्या आणि सत्याच्या बाजूनेच आदेश नेहमी उभे राहतात. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच आहोत आणि त्यांच्यासोबतच राहणार, असं सुचित्रा बांदेकर म्हणाल्या.

दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. तर या चित्रपटात सुचित्रा बांदेकर यांच्याबरोबरच रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suchitra Bandekar (@suchitrabandekar)

- Advertisement -


हेही वाचा : ‘अफलातून’साठी जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -