घरमहाराष्ट्रDevendra Fadnavis : शरद पवारांना 'छत्रपती संभाजीनगर' मान्य नाही; फडणवीसांचा आरोप

Devendra Fadnavis : शरद पवारांना ‘छत्रपती संभाजीनगर’ मान्य नाही; फडणवीसांचा आरोप

Subscribe

 

औरंगाबादः शरद पवार यांना छत्रपती संभाजीनगर नाव मान्य नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केला. तुम्ही नाव काहीही ठेवा. मी औरंगाबादच म्हणणार, असं शरद पवार म्हणतात, असेही फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री फडणवीस हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मोदी @9 या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करणं तुम्हाला मान्य आहे का?, अस प्रश्न फडणवीस यांनी उपस्थितांना विचारला. सर्वांनी हो असे उत्तर दिले. त्यावर फडणवीस म्हणाले, संभाजीनगर नाव हे शरद पवारांना मान्य नाही. तुम्ही काहीही नाव ठेवा. मी औरंगाबादच म्हणणार, असं शरद पवार म्हणतात. पण तुम्ही कितीही औरंगाबाद म्हटलं तरी छत्रपती संभाजी महाराजांना आमच्या मनातून कोणीच काढू शकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आम्ही कधीच विसरु शकत नाही.

हेही वाचाःपहाटेच्या शपथविधीवरून सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला, म्हणाल्या…

- Advertisement -

मी पण गुगली टाकेन; फडणवीसांचा शरद पवारांना टोला

मी सकाळच्या शपथविधीवर जे बोललो ते अखेर शरद पवार यांनी मान्य केलं आहे. शरद पवार म्हणत असतील की त्यांनी गुगली टाकली तर मीही गुगली टाकेन आणि हळूहळू सर्व सत्य त्यांच्याकडून वदवून घेईन, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सन 2019 ला भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होणार होतं. सर्व तयारी झाली होती. पण शेवटच्या क्षणी शरद पवार यांनी माघार घेतली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. मी गुगली टाकली होती. विकेट दिली. आता मी तरी काय करणार, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, याचा अर्थ शरद पवार हे अखेर खरं बोलले. शरद पवार हे खरं बोलले याचा मला आनंद आहे.  पण त्यांनी अर्ध सत्य सांगितलं. त्यांनी गुगली टाकली असेल तर मी पण गुगली टाकेन आणि हळूहळू सर्व सत्य त्यांच्याकडून वदवून घेईन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -