घरमहाराष्ट्रMLA Disqualification Case : ठाकरे गटाने थेट पुरावा दाखवला; पण एकनाथ शिंदेंचा...

MLA Disqualification Case : ठाकरे गटाने थेट पुरावा दाखवला; पण एकनाथ शिंदेंचा ई-मेल आयडी नेमका कोणता?

Subscribe

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) आमदार अपात्रता प्रकरणी (Mla Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची उलटतपासणी घेतली. यावेळी ठाकरे गटाने एकनाथ शिंदे (Eknath Shine) यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश ज्या ई-मेल आयडीवर पाठवले होते, तो त्यांचा नसल्याचा दावा महेश जेठमलानी यांनी केला होता. मात्र आता ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी ई-मेल आयडीचा पुरावाच सादर केला आहे. पण ठाकरे गटाने सादर केलेला आणि एकनाथ शिंदे यांचा ई-मेल आयडी वेगळा असल्याचे समोर येत आहे. (MLA Disqualification Case Thackeray Group Shows Direct Evidence But what exactly is Eknath Shindes email ID)

हेही वाचा – Sharad Pawar : निवडणुका झाल्यानंतर एक नवी फळी दिसेल; आमदार बैठकीत शरद पवाराचं वक्तव्य

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची उलटतपासणी होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ई-मेल आयडी वरून सुनावणी दरम्यान वाद रंगलेला पाहायला मिळाला. सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश ज्या ई-मेल आयडीवर पाठवले होते, तो त्यांचा नसल्याचा दावा महेश जेठमलानी यांनी केला होता. तसेच माध्यमांशी बोलताना महेश जेठमलानी असेही म्हटले होते की, सुनील प्रभू यांनी पत्र पाठवलं होतं. मात्र आता ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या ई-मेल संदर्भातील आरोपावर उत्तर दाखल करण्यात आलं आहे. आम्ही एकनाथ शिंदेंच्या खऱ्या ई-मेल आयडीवर आदेश पाठवले आहेत. हा ई-मेल आयडी विधानसभा सदस्यांच्या यादी पुस्तिकेत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

ठाकरे गटाने उत्तरात काय म्हटले?

एकनाथ शिंदे यांना 22 जून 2022 रोजी सुनील प्रभू बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश ज्या ई-मेल आयडीवर पाठवण्यात आले होते, त्यावर शिंदे गटाचे वकील महेठ जेठमलानी यांनी प्रश्न केले होते. यावेळी त्यांनी अध्यक्षांना अर्ज करताना सुनील प्रभू यांनी पाठवलेला ई-मेल आयडी चुकीचा असल्याचा दावा केला होता. परंतु आता ठाकरे गटाने यासंदर्भात पुराव्यासह उत्तर सादर केले आहेत. ठाकरे गटाने उत्तर सादर करताना 20 जून 2022 रोजीच्या महाराष्ट्र विधानसभा सदस्यांची यादी पुस्तिका सादर केली आहे. ज्यात राज्यातील सर्व आमदारांचे नाव, पत्ता, फोन नंबर आणि त्यासोबतच ई-मेल आयडी आहेत. या पुस्तिकेमध्ये एकनाथ शिंदे यांचा ईमेल आयडी eknath.shinde@gmail.com असा आहे. ठाकरे गटाने नमूद केलेल्या आणि एकनाथ शिंदे यांना बैठकीसाठी ज्या ई-मेल आयडीवर आदेश पाठवले, त्याचा संदर्भ या पुस्तिकेमध्ये असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – BJP Vs Thackeray Group: काड्या लावण्याचे एकमेकांवर आरोप; संजय राऊत यांच्यावरून कलगीतुरा

ई-मेल आयडी अस्तित्वात नसल्याचा शिंदे गटाचा दावा

दरम्यान, शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे यांना बैठकीसाठी ज्या ई-मेल आयडीवर आदेश पाठवले, तो ई-मेल आयडी अस्तित्वा नसल्याचा दावा केला होता. त्यांनी सुनीवणीदरम्यान 2023 च्या पुस्तिकेमधील आमदारांच्या माहितीचा संदर्भ देत असेही म्हटले की, एकनाथ शिंदे यांचा ई-मेल आयडी ministereknathshinde@gmail.com असा असल्याचा दावा केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -