घरमहाराष्ट्रपहाटेच्या शपथविधीवरून सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला, म्हणाल्या...

पहाटेच्या शपथविधीवरून सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला, म्हणाल्या…

Subscribe

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत आता सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस ह अजुनही पहाटेच्या शपथविधीमध्ये अडकून पडले असल्याचा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला आहे.

मुंबई : 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेच्यावेळी घेतलेली शपथ ही राजकारणातील ऐतिहासिक घटना आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी ही घटना लागल्याचे वारंवार दिसून आली आहे. कारण फडणवीस हे नेहमीच या घटनेबाबत बोलत असतात. नुकतेच रिपब्लिकन इंडिया या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी नेमका कसा घडला? याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी यावेळी शरद पवार यांनी नेमकी कशी गुगली टाकली याबाबत माहिती दिली आहे. फडणवीसांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत आता सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस ह अजुनही पहाटेच्या शपथविधीमध्ये अडकून पडले असल्याचा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला आहे. (Supriya Sule criticize to Devendra Fadnavis over the early morning swearing-in ceremony)

हेही वाचा – Devendra Fadnavis : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात; दिल्ली दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

- Advertisement -

आज सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांची मुंबई आणि नवी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांकडून व्हा. बी. चव्हाण सेंटरमध्ये पुस्तकी तुला करण्यात आली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युतीच्या वर्षभरातील कारभारावर टीका केली. “देवेंद्र फडणवीस अजूनही त्या शपथविधीत अडकलेले आहे. कारण त्यांना राज्यातील मूळ मुद्द्यात हातच घालायचा नाही. देवेंद्र फडणवीस कधीच महिला सुरक्षा, महागाई आणि मूलभूत गोष्टींवर भाष्य करत नाही. महिला भगिनीवर होणाऱ्या अत्याचाराबाबत देखील ते कधीच बोलत नाही,” अशी टीका त्यांच्याकडून करण्यात आली.

तसेच, “प्रशासन सोडून सातत्याने मागे जाणं, गॉसिप करणं या गोष्टींमध्येच हे सरकार मग्न आहे आणि हे सर्व खूप दुर्दैवी आहे. प्रशासन सोडून हे सरकार सगळं करतं. भारतीय जनता पक्षाचं च्युइंगमसारखा झालं आहे. च्युइंगम पहिल्यांदा खाल्ल्यावर चांगलं वाटतं, नंतर ते बेचव होत जातं. असंच भारतीय जनता पक्षाचं झालं आहे. च्युइंगमप्रमाणे भारतीय जनता पक्षाची टेस्ट दिवसेंदिवस खराब होत चालली आहे,” असा टोला देखील सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला.

- Advertisement -

मला बारामती लोकसभा मतदारसंघ, राज्य आणि संघटनेची इतकी काम असतात की मला गॉसिप करायला फारसा वेळ मिळत नाही. भारतीय जनता पक्षाला शरद पवार आणि अजित पवार यांच्याशिवाय दुसरं कोणी दिसत नाही. सध्या महाराष्ट्राचे राजकारण हे माझ्या वडिलांवर (शरद पवार), भावावर (अजित पवार) आणि पक्षातील नेत्यांवर सुरू आहे, याचा मला अभिमान आहे, असेही त्या म्हणाल्या.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -