घरमहाराष्ट्रSupriya Sule : आमदार रोहित पवारांसह युगेंद्र पवारांना संरक्षण द्या, सुप्रिया सुळेंचे...

Supriya Sule : आमदार रोहित पवारांसह युगेंद्र पवारांना संरक्षण द्या, सुप्रिया सुळेंचे पुणे पोलिसांना पत्र

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा ज्वर आता चढत चालला आहे. महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघ तर आता प्रतिष्ठेचा बनला आहे. येथे विद्यामान खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात सरळ लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – Bombay High Court : कोविड बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणावरून आर्थिक गुन्हे शाखेला न्यायायलाने झापले

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (एनसीपी-एसपी) खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र पुण्याच्या पोलीस अधीक्षकांना लिहिले आहे. या पत्राची ते अवश्य दखल घेतील हा विश्वास आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे लोकसभा निवडणूक प्रचार दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी जात आहेत. संवैधानिक पद्धतीने, शांतपणे आणि लोकशाही मार्गाने लोकांशी सुसंवाद साधत आहेत. परंतु काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याच प्रयत्न करत आहेत. विविध वृत्तवाहिन्या आणि समाज माध्यमातून ही घटना सर्वांसमोर आली असून संबंधितांची ही कृती पूर्णपणे असंवैधानिक आहे, असे या पत्रात एनसीपी-एसपीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – SRA : BMC आयुक्तांच्या उचलबांगडीनंतर SRAमध्ये एकाच जागी चिकटलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केव्हा?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारे बहाल केलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी घडविलेल्या संवेदनशील महाराष्ट्रात असे घडणे शोभादायक नाही. या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाला आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ही अतिशय चिंतेची व गंभीर बाब आहे, असे सांगत, सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यात हे अपेक्षित नाही. यामुळे आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना आवश्यक ती सुरक्षा तातडीने पुरविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.

हेही वाचा – BMC FD : पालिकेच्या ठेवींवर शिंदे सरकारकडून दरोडा; MMRDA ला 1000 कोटी देण्यावरुन आदित्य ठाकरे भडकले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -