घरताज्या घडामोडीCovid Center Scam : सूरज चव्हाणांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी...

Covid Center Scam : सूरज चव्हाणांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू

Subscribe

कथित जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. सूरज चव्हाण हे मुंबई पोलिसांच्या मुख्य कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. कोविड घोटाळा संदर्भात ईडीने चौकशी केल्यानंतर आता मुंबईची एसआयटी टीम सुद्धा त्यांची चौकशी करत आहे. कॅगच्या अहवालानुसार, मुंबई पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावर एसआयटी स्थापन करण्यात आली होती. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या देखरेखीखाली एसआयटी काम करत आहे. कॅगने मुंबई महापालिकेच्या बारा हजार कोटी रुपयांच्या खर्चात झालेली कथित अनियमितता अधोरेखित केली होती. पालिकेच्या नऊ विभागांनी एकूण 12 हजार कोटींच्या खर्चात अनियमितता असल्याचा कॅगचा अहवाल होता. यावेळी रस्ते, माहिती तंत्रज्ञान आणि ब्रीज विभागाने केलेल्या खर्चाची चौकशी सुरू केली.

- Advertisement -

या प्रकरणी मनी लॉड्रिंगचा तपास करणाऱ्या ED ने सुजित पाटकर आणि दहिसर जम्बो कोव्हिड सेंटरचे डीन किशोर बिसुरे यांना अटक केली आहे. ED ने केलेल्या तपासात समोर आलेली माहिती आर्थिक गुन्हे शाखेला सुपूर्द केली. त्याच माहितीच्या आधारे सूरज चव्हाण यांची चौकशी सुरू आहे.

सूरज चव्हाण यांची ईडी चौकशी

माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे जवळचे सहकारी, युवासेनेचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांची घरामध्ये 15 तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर ईडीने सोमवारी पुन्हा सुमारे आठ तास त्यांची चौकशी केली. या जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यात ईडीच्या रडारवर चार मध्यस्थ असून त्यातील एक सूरज चव्हाण आहे. चार ते पाच करारांमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख असल्याने त्यांच्याशी संबंधित रोखीच्या व्यवहारांची ईडीकडून छाननी सुरू आहे. चव्हाण यांच्या भावाच्या तीन कंपन्या असून त्यापैकी एक बंद पडली. तर, उर्वरित दोन कंपन्या कोविड-19 महामारीच्या वेळी उघडण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. ईडी या कंपन्यांमधील पैशांचा स्रोत तपासत आहे.

- Advertisement -

मुंबई उपनगरात चव्हाण यांचे चार फ्लॅट्स ईडीला आढळले असून त्यांची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, कोरोना काळात त्यांची खरेदी करण्यात आली होती. सूरज चव्हाण यांना या फ्लॅट्सबद्दल विचारले असता, ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत आणि आता दाव्याचे समर्थन करणारी कागदपत्रे सादर करण्यास त्यांना सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुरवठादारांसोबतच्या रोख व्यवहारांच्या नोंदी असलेली डायरी देखील ईडीने तपासली. या कथित घोटाळ्यात पालिका अधिकारी, मध्यस्थ, वितरक, कंत्राटदार यांच्याबरोबरच राजकीय व्यक्तींचाही सहभाग असल्याचे सांगितले जाते.

संजीव जयस्वाल ईडीच्या रडारवर

सनदी अधिकारी संजीव जयस्वाल हेही ईडीच्या रडारवर आहेत. मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त असलेले जयस्वाल आता म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत. कोविड काळातील आरोग्यसेवा, कर्मचारीवर्ग आणि उपकरणे यांच्याशी संबंधित कंत्राटे देण्यात त्यांचा सहभाग होता. त्यामुळे ईडीने त्यांनाही चौकशीसाठी पाचाराण करण्यात आले, पण त्यांनी आतापर्यंत दोनवेळा मुदत मागितली आहे.


हेही वाचा : सूरज चव्हाण, संजीव जयस्वालसह कंत्राटदार, पालिकेचे अधिकारी गोत्यात, 22 कोटींचे मनीलाँड्रिंग?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -