घरमहाराष्ट्रकोल्हापूर : महाशिवआघाडीच पहिल यश; राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लाटकर महापौर

कोल्हापूर : महाशिवआघाडीच पहिल यश; राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लाटकर महापौर

Subscribe

कोल्हापुरात महाशिवआघाडीला पहिल यश आले असून कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अॅड. सुरमंजिरी लाटकर यांची वर्णी लागली असून उपमहापौरपदी कॉंग्रेसचे संयज मोहिते यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाशिवआघाडीचा मुख्यमंत्री होण्यासाठी जोरदार हालचाली सुरू असतानाच, आज कोल्हापुरात महाशिवआघाडीला पहिल यश आले आहे. कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अॅड. सुरमंजिरी लाटकर यांची वर्णी लागली असून उपमहापौरपदी कॉंग्रेसचे संयज मोहिते यांची निवड करण्यात आली आहे.

शिवसेनेचे चारही नगरसेवक गैरहजर

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अॅड. सुरमंजिरी लाटकर यांनी भाजप – ताराराणी आघाडीच्या उमेदवारांचा ११ मतांनी पराभव केला आहे. लाटकर यांना ४३ मते तर विरोधी उमेदवार भाग्यश्री शेटके यांना ३२ मते मिळाली आहेत. मोहिते यांना ४३ तर विरोधी ताराराणीचे कमलाकर भोपळे यांना ३२ मते मिळाली आहेत. या दरम्यान, सर्वांचे लक्ष हे शिवसेनेकडे लागले होते. मात्र, यावेळी शिवसेनेचे चारही नगरसेवक गैरहजर राहिल्याचे पाहायला मिळाले आहे.

- Advertisement -

कोल्हापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीची सभा मंगळवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात पार पडली. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अॅड. सुरमंजिरी लाटकर आणि भाजपच्या उमेदवार भाग्यश्री शेटके यांच्यात अटीतटीची लढत झाली. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे संजय मोहिते विरुद्ध ताराराणी आघाडीचे कमलकार भोपळे अशी लढत झाली होती.


हेही वाचा – खड्डे दाखवून ‘या’ तरुणाने कमावले ५ हजार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -