घरताज्या घडामोडीSwara Bhaskar : उत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसकडून अभिनेत्री स्वरा भास्कर?

Swara Bhaskar : उत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसकडून अभिनेत्री स्वरा भास्कर?

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. विरोधी पक्षातील उमेदवाराला टक्कर देण्याकरीता आपल्या पक्षात उमेदवरांची छाननी सुरू केली आहे. अशातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सेलिब्रिटी पॅटर्न पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. विरोधी पक्षातील उमेदवाराला टक्कर देण्याकरीता आपल्या पक्षात उमेदवरांची छाननी सुरू केली आहे. अशातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सेलिब्रिटी पॅटर्न पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार अभिनेता गोविंदा यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून तयारी सुरू असल्याचे समजते. तसेच, महाविकास आघाडीही सेलिब्रिटी पॅटर्नच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार, उत्तर मध्य मुंबई मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अभिनेते राज बब्बर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांची नाव चर्चेत आहेत. त्यातही स्वरा भास्करचं नाव आघाडीवर आहे. (Swara Bhasker And Raj Babbar Names From Congress For North Central Mumbai Constituency)

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री स्वरा भास्कर हिने नुकताच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची दिल्लीत भेट घेतली होती. या दोघांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी चर्चा झाल्याचे समजते. विशेष म्हणजे काँग्रेसच्या प्रत्येक मोठ्या आंदोलनात अभिनेत्री स्वरा भास्कर आघाडीवर असते. तसेच, सोशल मीडियावरही स्वरा बेधडकपणे आपली मतं मांडत असते. अनेकदा तिने तिच्या पोस्टद्वारे सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यामुळेच उत्तर मध्य मुंबई मतदारसंघासाठी स्वरा भास्कर हिच्या नावाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, उत्तर मध्य मुंबई हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

- Advertisement -

काँग्रेसने गुरुवारी 57 जणांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवार आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. शिवाजीराव काळगे, सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे, नंदूरबार लोकसभा मतदारसंघातून गोवल पाडवी, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज, अमरावती लोकसभा मतदारसंघातून बळवंत वानखेडे, पुणे लोकसभा मतदारसंघातून रविंद्र धंगेकर, नांदेड लोकसभा मतदारसंघातून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने गुरुवारी जाहीर केलेल्या 57 जणांच्या यादीत महाराष्ट्रासह कर्नाटकमधील 17, गुजरातमधील 11, राजस्थानमधील 6, तेलंगणामधील 5, आंध्र प्रदेशमधील 2, पश्चिम बंगालमधील 8 आणि पुद्दुचेरीमधील एक उमेदवाचारा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ARVIND KEJRIWAL : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 10 दिवसांची ईडी कोठडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -