घरमनोरंजन... तर तो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान असेल; खोपकरांचा रणदीप हुड्डाला इशारा

… तर तो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान असेल; खोपकरांचा रणदीप हुड्डाला इशारा

Subscribe

स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबाबत स्वामित्व हक्कावरून वाद निर्माण झाल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं याबाबत संताप व्यक्त केला आहे. तसंच, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी थेट दिग्दर्शक रणदीप हुड्डा याला इशाराच दिला आहे.

सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. वीर सावरकर सिनेमात रणदीप हुड्डा स्वातंत्र्यवीर सावकरांची भुमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमाच्या टीझरपासूनच प्रेक्षकांच्या मनात सिनेमाविषयी उत्सुकता आहे. असं असताना, हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबाबत स्वामित्व हक्कावरून वाद निर्माण झाल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं याबाबत संताप व्यक्त केला आहे. तसंच, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी थेट दिग्दर्शक रणदीप हुड्डा याला इशाराच दिला आहे. ( Swatantryaveer Savarkar movie MNS leader Amey Khopkar Wrote letter to Randeep Hooda )

खोपकरांचं पत्र जसंच्या तसं

अमेय खोपकर यांनी रणदीप हुड्डाला आणि निर्माते आनंद पंडित यांना पत्र लिहिलं आहे. अमेय खोपकर यांनी या पत्राचा फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. या पत्रामध्ये अमेय खोपकर यांनी लिहिलं आहे की, “हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट. हिंदी भाषेतून जगभरात प्रदर्शित होणं ही तमाम सावरकरप्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट आहे. लंडनमध्ये म्हणजेच थेट इंग्रजांच्या भूमीत इंग्रजांना आव्हान देऊन स्वातंत्र्यवीरांनी समस्त जगाला अचंबित केलं होतं. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. तरीही शेवटपर्यंत ते ब्रिटीशांपुढे झुकले नाहीत.
भारतमातेला ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं अशा स्वातंत्र्यवीरांची धगधगीत गाथा मोठ्या पडद्यावर पाहण्याची मोठी उत्सुकता आहे.

- Advertisement -

प्रदर्शनापूर्वी मात्र आता स्वामित्वहक्कांवरुन वाद सुरु झाला आहे, जो अतिशय दुर्दैवी आहे. हा वाद ताबडतोब थांबायला हवा, कारण यामुळे चित्रपट प्रदर्शनाला विलंब झाला तर तो खुद्द स्वातंत्र्यवीरांचा अपमान असेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न कुणीही करु नये. हा वाद त्वरित मिटवण्यात यावा आणि स्वातंत्र्यवीरांचं कार्य घराघरात पोचावं ही आमची भूमिका आहे. आम्ही दिलेल्या इशाऱ्याचा आपण योग्य आदर राखाल अशी आमची अपेक्षा आहे. “

( हेही वाचा: मोठी बातमी: अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी राष्ट्रवादीचे दोन व्हीप )

- Advertisement -

महेश मांजरेकरांची चित्रपटातून माघार

स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटातून रणदीप हुड्डा हा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. रणदीपच्या हुड्डाच्या आधी स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी महेश मांजरेकर यांना देण्यात आली होती. परंतु, काही काळानंतर अचानक महेश मांजरेकरांनी या प्रोजेक्टमधून माघार घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -