घरमहाराष्ट्रसिन्नरजवळ भरधाव स्विफ्ट कारने साईभक्तांना चिरडले

सिन्नरजवळ भरधाव स्विफ्ट कारने साईभक्तांना चिरडले

Subscribe

दोन जण ठार; 22 गंभीर जखमी

सिन्नर-शिर्डी महामार्गावर देवपूर फाट्याजवळ भरधाव स्विफ्ट कारने शिर्डीकडे जात असलेल्या मुंबई येथील साईभक्तांना चिरडल्याने दोन जण ठार तर 22 गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.22) सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली. अविनाश अशोक पवार (30), अनिकेत दीपक मेहेत्रे (18) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कांदिवली पूर्व, मुबंई समतानगर येथील साईराम पालखी शिर्डीकडे पायी जात होती. काल सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान साई नामाचा जप करीत शिर्डीच्या दिशेने चाललेल्या पालखीतील 15 फुटी देखावा असलेल्या रथाला देवपूर फाट्याच्यापुढे भरधाव वेगात जाणार्‍या स्विफ्ट कारने (क्र एम एच 15 सी टी 9101) जोरदार धडक दिली. गाडीने पालखीसोबत असलेल्या साईभक्तांना चिरडले. त्यात 3 साईभक्त ठार झाले तर 18 गंभीर जखमी झाले आहे. अपघातानंतर सर्वत्र रक्तामासाचा सडा पडला होता, जखमी साईभक्त विव्हळत होते, सर्वत्र आरडाओरड अन् किंचाळ्याच किंचाळ्या ऐकू येत होत्या.

- Advertisement -

अपघातानंतर रस्त्याने ये-जा करणार्‍या प्रवाशांनी वाहने थांबून मदत कार्य सुरू केले. अपघात होऊन एक तास उलटूनही पोलीस घटनास्थळी पोहचले नसल्याने साईभक्त संतप्त झाले. साईभक्तांनी रस्तारोको सुरु केल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेल्या कारचीही मोडतोड करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर अपघातात जखमी झालेल्या साईभक्तांना उपचारार्थ शिर्डी, सिन्नर व नाशिक येथे पाठविण्यात आले. शिर्डी येथे उपचार सुरु असताना अविनाश पवार व अनिकेत मेहेत्रे यांचा मृत्यू झाल्याचे समजते. आणखी एका साईभक्ताचा मृत्यू झाला, मात्र नाव समजू शकले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -