घरमहाराष्ट्र‘सक्शन पंपां’मुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांना दिलासा

‘सक्शन पंपां’मुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांना दिलासा

Subscribe

ससूनला सढळ हाताने मदत

पुणे:-पुणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असणारे ‘सक्शन पंप’ ससून रुग्णालयात आल्याने स्वाईन फ्लूच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. समाजातील विविध दात्यांकडून ससूनला सढळ हाताने मदत होत असल्याने रुग्णालय दिवसेंदिवस अत्याधुनिक होत आहे. हजारो रुग्ण रोज येथे उपचार घेत असून दुर्मिळातील दुर्मिळ शस्त्रक्रियादेखील येथे होत आहेत. खर्‍या अर्थाने समाजाचे रुग्णालय असा नावलौकिक होत आहे, असे मत ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषद सदस्य आणि ‘सृजन’ संस्थेचे प्रमुख रोहित पवार यांच्या पुढाकारातून ‘सृजन क्रिकेट करंडका’च्या खेळाडूंमार्फत ससून रुग्णालयाला चार सक्शन पंप डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

तरुणांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून सृजन व्यासपीठाची निर्मीती रोहित पवार यांच्या माध्यमातून करण्यात आली असून कला, क्रीडा, उद्योजकता अशा विविध क्षेत्रातील तरुणांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यावर सृजनचा भर राहिलेला आहे. याच व्यासपीठामार्फत आजवर नाशिक येथे बालमृत्यू रोखण्यासाठी अत्यावश्यक आरोग्य सुविधा, बेबी वार्मर याचसोबत राज्यातील इतर ठिकाणी डिजीटल वजन यंत्र, रुग्णवाहिका भेट, दिव्यांग व्यक्तींना अत्यावश्यक उपकरणे अशा विविध सामाजिक उपक्रमात सृजनचे तरुण सहभागी होत आलेले आहेत. येत्या ३० ऑक्टोबर पासून ते १६ डिसेंबर पर्यंत पुणे शहर, पिंपरी चिंचवड सह संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सृजन क्रिकेट करंडकच्या चौथ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. आजवर सहभागी झालेल्या खेळाडूंच्या उपस्थितीत सामाजिक जाणीव म्हणून ससून रुग्णालयास सक्शन पंपची भेट देण्यात आली.

- Advertisement -

याबाबात रोहित पवार म्हणाले की, युवकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे, संधी निर्माण करणे हा सृजन व्यासपीठाचा मुख्य हेतू असला तरी आपण आपले सामाजिक कर्तव्य विसरता कामा नये. सहभागी होणार्‍या प्रत्येक खेळाडूला सामाजिक जाणीव असते, त्यास कृतीची जोड मिळावी म्हणून ससून रुग्णालयात जाणवणार्‍या अत्यावश्यक सेवामध्ये समाज म्हणून योगदान देता यावं म्हणून सृजन व्यासपीठामार्फत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी असे उपक्रम सृजन मार्फत राबवण्यात आले असून भविष्यकाळातदेखील सृजनचे खेळाडू सामाजिक उपक्रमांसाठी कटिबद्ध असतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -