घरमहाराष्ट्रतामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे मायबोलीवर प्रेम अन् उद्धव ठाकरे बोलले हिंदीत

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे मायबोलीवर प्रेम अन् उद्धव ठाकरे बोलले हिंदीत

Subscribe

इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीसाठी देशभरातील 28 पक्षांचे 65 नेते सहभागी झाले होते.

मुंबई : करारी मराठी बाणा, मराठीचा अभिमान, मराठी माणूस जगला पाहीजे, तरला पाहिजे असा कडवट मराठी माणूस अशी स्व. बाळासाहेब ठाकरेंची ओळख होती. अगदी मार्मिकपासून तर सामनापर्यंत त्यांचे लिखाण मराठी माणसांसाठीच होते. आज मराठी माणसाठी लढणारे उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीच्या समारोपाप्रसंगी हिंदीतून संबोधन केले तर याच वेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी त्यांच्या मायबोलीवर प्रेम दाखवत चक्क महाराष्ट्रात येऊन तामिळ भाषेतूनच संबोधन केले. त्यामुळे या विषयाची चर्चा होत आहे.(Tamil Nadu Chief Minister M.K. Stalin’s love for Myboli and Uddhav Thackeray spoke in Hindi)

इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीसाठी देशभरातील 28 पक्षांचे 65 नेते सहभागी झाले होते. दरम्यान या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेतून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकारवर घणाघात केला. मुंबईत होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष होते. यावेळी मात्र, उद्धव ठाकरे यांनी हिंदीतून नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -

संजय राऊतांचेही हिंदीतून सूत्रसंचालन

यावेळी पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. मात्र तेसुद्धा हिंदीतूनच बोलत होते. तर मंजुर झालेले ठराव वाचण्यासाठी आलेले आदित्य ठाकरे यांनी ते इंग्रजीतून वाचून दाखवले हे विशेष.

हेही वाचा : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज : धुळे-सोलापूर महामार्गावर जाळपोळ; नेत्यांनी नोंदवला निषेध

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठी पाट्यांची सक्ती

राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक अर्थात पाट्या मराठी भाषेत असाव्यात असा निर्णय 12 जानेवारी 2022 रोजी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा : गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय…; संजय राऊतांनी मोदींसह राज्य सरकारवर केला हल्लाबोल

आता होऊ शकते टीका

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत जाण्याच्या निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप केल्या जात आहे. दरम्यान आता उद्धव ठाकरे यांनी मराठीत न बोलता हिंदीतून भाषण केल्याने पुन्हा एकदा ते विरोधकांच्या निशाण्यावर आले असून, त्यांच्यावर मराठी बाणा सोडल्याचीही टीका होऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -