घरमहाराष्ट्रबुलडाण्याच्या ७ जणांचा तामिळनाडूमध्ये अपघाती मृत्यू

बुलडाण्याच्या ७ जणांचा तामिळनाडूमध्ये अपघाती मृत्यू

Subscribe

बुलडाणा जिल्ह्यातील खामगावच्या दालफैल भगत येथे राहणारे नारायण देशमुख यांचे कुटुंब हे सुवर्ण मंदिराचे दर्शनासाठी गेले असता अपघात झाला.

बंगळूरु येथे अपघातामध्ये महाराष्ट्रातील ७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तामिळनाडू येथे कार आणि मालवाहक कंटेनरचा भीषण अपघात झाला. यामध्ये महाराष्ट्रातल्या बुलडाणा जिल्ह्यातल्या ७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यातील खामगावच्या दालफैल भगत येथे राहणारे नारायण देशमुख यांचे कुटुंब हे सुवर्ण मंदिराचे दर्शनासाठी गेले होते. त्या दरम्यान हा भीषण अपघात झाला.

दालफैल भगत येथे राहणारे नारायण देशमुख यांचे कुटुंबिय सुवर्ण मंदिराच्या दर्शनासाठी स्विफ्ट गाडीने चेन्नईला निघाले होते. दरम्यान, तामिळनाडू येथे त्यांच्या स्विफ्ट गाडी आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. मृतांमध्ये २ अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. अपघातामध्ये मिलिंद देशमुख, त्यांच्या पत्नी किरण देशमुख, मुलगा आदित्य देशमुख, अजिंक्य देशमुख यांच्या समावेश तसंच राजेश देशमुख आणि त्याच्या पत्नी सारिका देशमुख यांचा मृतकांमध्ये समावेश आहे. तर या गाडीच्या चालकाचा देखील अपघातामध्ये दुर्देवी मृत्यू झाला.

- Advertisement -

मिलिंद देशमुख हे रेल्वे पोलीस कर्मचारी असल्याचे समजते. वेल्लोरे येथून सुवर्ण मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर ते बंगळुरूला परत येत होते. दरम्यान चार चाकीचा टायर फुटल्याने चालकाचा गाडीवरुन ताबा सुटला आणि या दरम्यान गाडी कंटेनरला जाऊन धडकली. या अपघातात ३ पुरुष, २ महिला आणि २ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. महत्वाचे म्हणजे राज्यमंत्री रवींद्र देशमुख यांचे अंगरक्षक आनंद देशमुख यांचे मृतक हे भाऊ असल्याचे समजते. दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर देशमुख कुटुंबावर शोककळा पासरलीय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -