घरमुंबईपोलीस असल्याचं सांगितलं आणि लग्न करून मोकळा झाला!

पोलीस असल्याचं सांगितलं आणि लग्न करून मोकळा झाला!

Subscribe

पोलीस असल्याची बतावणी करून एका तरूणीशी फसवून विवाह करणाऱ्या बामट्याला पोलिसांनी अटक केली आहे.

लग्न जुळवता नवऱ्या मुलाकडची आणि मुलीकडची नातेवाईक मंडळी भरपूर चौकशी आणि तपास करूनच लग्नाला होकार देतात. पण त्यानंतरही फसवाफसवीचे प्रकार घडतात. बदलापूरमध्ये असाच एक प्रकार समोर आला असून इथे तर चक्क एका भामट्यानं आपण पोलिसात असल्याची बतावणी करून एका तरुणीला आणि तिच्या आख्ख्या कुटुंबालाच गंडा घातला आहे. या भामट्याच्या बतावणीला भुलून पीडित कुटुंबियांनी मुलीचं लग्न सुद्धा या भामट्यासोबत लावून दिलं. पण नंतर जेव्हा सगळा प्रकार समोर आला, तोपर्यंत उशीर झाला होता. या भामट्याचं नाव किरण महादेव शिंदे (२४) असून बदलापूरमध्ये राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणी आणि तिच्या कुटुंबियांना त्याने फसवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

फोटोला भुलले आणि लग्न लावून दिलं!

त्याचं झालं असं, की किरण बदलापूरच्या खरवई नाक्यावरच्या अरिहंत-अनमोल सोसायटीमध्ये राहातो. बदलापूरमध्येच राहणाऱ्या पीडितेला आणि तिच्या घरच्यांना फसवण्यासाठी त्याने आपले पोलिसी गणवेशातले फोटो काढून घेतले होते. लग्नासाठी मागणी घालण्यासाठी म्हणून त्याने हे फोटो तरूणीच्या घरच्यांना पाठवले होते. विशेष म्हणजे या गणवेशासोबतच त्याने बनावट ओळखपत्र आणि बनावट नेमप्लेट देखील बनवून घेतली होती. त्याचा हा सर्व लवाजमा पाहिल्यानंतर पीडित तरूणी आणि तिच्या घरच्यांचा त्याच्या भुलथापांवर विश्वास बसला. आणि त्यांनी तरूणीचं लग्न किरणशी लावून दिलं.

- Advertisement -

police fraud


हेही वाचा – उबेर टॅक्सीचालकाकडून तरुणीची फसवणूक

चौकशी केल्यावर बसला धक्का!

ठरल्याप्रमाणे १३ एप्रिल २०१८ रोजी लग्न झाल्यानंतर किरण पीडित तरुणीसोबत अंबरनाथमधल्या महात्मा चौक परिसरात राहायला गेला. या दरम्यान आपल्या नोकरीबाबत त्याचं पीडितेच्या कुटंबियांसोबत खोटं बोलणं सुरूच होतं. पण पोलीस नोकरीला असलेला माणूस वारंवार घरी कसा राहतो? त्याची पोस्टिंग सध्या कुठे आहे? असे अनेक प्रश्न मनीषा आणि तिच्या नातेवाईकांना सतावत होते. या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाशी त्यांनी संपर्क साधून किरण शिंदे पोलीस खात्यात नोकरीस असल्याबाबत चौकशी केली. पण तिथे त्यांना समजलेलं वास्तव त्यांना मोठा धक्का देणारं होतं.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – सावधान! रेल्वे भरतीच्या नावाखाली लागतोय कोट्यवधींचा चुना!

आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी

किरण कोणत्याही पोलीस पदावर नसून त्याच्या नोकरीची माहिती खोटी असल्याचं तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं. हे ऐकल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी लागलीच शिवाजी नगर पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात तक्रार केली. पोलिसांनी किरण शिंदेविरोधात गुन्हा दाखल करून त्याला तातडीनं त्याच्या घरून अटक केली. यानंतर त्याला कोर्टात हजर केलं असता त्याची १९ मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एन. सातपुते करीत आहेत.


हेही वाचा – परदेशातील नोकरीचे आमिष देत ४० जणांची फसवणूक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -