घरमहाराष्ट्रभीषण अपघात, क्रूझरचा टायर फुटला, गाडी थेट नदी पात्रात

भीषण अपघात, क्रूझरचा टायर फुटला, गाडी थेट नदी पात्रात

Subscribe

धुळे – मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या क्रुझर आणि चारचाकी वाहनाचा मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे तापी नदी पुलावर भीषण अपघात झाला आहे. मजुरांना घेऊन जाणाऱ्या क्रुझरचा टायर फुटल्याने मागून येणाऱ्या चारचाकी वाहना धडक लागली. परिणामी चारचाकी वाहन तापी नदीत जाऊन कोसळले आहे. काल रात्री १० च्या दरम्यान हा अपघात झाला आहे. याप्रकरणी ५ मजूर जखमी झाले असून वाहनाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

वैजापूर येथून ही क्रुझर मजुरांना घेऊन मध्य प्रदेशातील शेंधवाकडे जात होती. यावेळी मुंबई-आग्रा महामार्गवर क्रुझर आली असता टायर फुटला. यामुळे क्रुझरचा तोल गेल्याने मागून येणाऱ्या वाहनाला धडक लागली. परिणामी हे वाहन तापी पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळले. या अपघातात ५ जण गंभीर जखमी असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मात्र, नदीत पडलेले वाहन अद्यापही सापडलेलं नाही.

- Advertisement -

जखमी मजुरांवर शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल कऱण्यात आलं आहे. घटनास्थळी शिरपूर शहर आणि नरडाणा पोलीस दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -