घरमहाराष्ट्रराज्यात एकनाथ शिंदेंची बंडखोरी; दिल्लीत अमित शाह, जे.पी. नड्डांची बैठक

राज्यात एकनाथ शिंदेंची बंडखोरी; दिल्लीत अमित शाह, जे.पी. नड्डांची बैठक

Subscribe

यात राज्यातील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाल्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे

राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारला मोठा सुरुंग लागण्याची शक्यता ही वर्तवली जातेय. शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे मोठ्या बंडखोरीच्या तयारीत आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे गेली अनेक तास नॉट रिचेबल होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे २० हून अधिक आमदारची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आता एकनाथ शिंदेंची मनधारणी करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. परंतु या राजकीय घडामोडींमुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पडणार की काय अशा चर्चा रंगत आहेत. राज्यातील राजकीय घडामोडी पाहता दुसरीकडे दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

यात राज्यातील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाल्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी तातडीने बैठक बोलवली आहे. दरम्यान राज्यातील भाजपचे बडे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील दिल्लीला रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीस दिल्लीहून आता अहमदनगरमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान काही भाजप आमदार आता सध्या एकनाथ शिंदे असलेल्या सुरतमधील हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. याचवेळी फडणवीसही एकनाथ शिंदेंची भेट घेण्याची चर्चा आहे.

- Advertisement -

सोमवारी विधान परिषद निवडणुकीत भाजपचे पाच उमेदवार निवडून आले. या निकालामुळे राज्यसभेप्रमाणे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. दरम्यान शिवसेनेचे ५५ आमदार आणि सहयोगी आमदार ९ असे मिळून ६४ आमदार असते वेळी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार २६ चा कोटा घेऊन काटावर विजयी झाले. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या आकडेवारीवरून शिवसेनेची १० पेक्षा जास्त मते फुटल्याचे म्हटले जातेय. एकूणच शिवसेनेतील घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवरची नाराजीच यातून दिसते. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावरून भाजपाची भूमिका काय असावी? यासंदर्भात भाजप नेत्यांमध्ये चर्चांना वेग आला आहे.


शिवसेनेत एकनाथ शिंदे नाराज, नॉट रिचेबल असल्याने मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलावली बैठक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -