घरमहाराष्ट्रMLA Disqualification Case : 'घटनाबाह्य सरकारला विधानसभा अध्यक्षांचं संरक्षण'; राऊतांचा नार्वेकरांवर घणाघात

MLA Disqualification Case : ‘घटनाबाह्य सरकारला विधानसभा अध्यक्षांचं संरक्षण’; राऊतांचा नार्वेकरांवर घणाघात

Subscribe

राज्यात जे घटनाबाह्य सरकार आहे त्याला या अध्यक्षांचं संरक्षण आहे, असा घणाघात ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केला आहे.

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने विधासभा अध्यक्षांनी हा पोरखेळ मांडला आहे का? असं म्हणत ताशेरे ओढले. आतापर्यंत न्यायालयाने कोणत्याही अध्यक्षांचे अशाप्रकारे कान उपटले नव्हते. राज्यात जे घटनाबाह्य सरकार आहे त्याला या अध्यक्षांचं संरक्षण आहे, असा घणाघात ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केला आहे. राऊत मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते, यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीकास्त्र डागलं आहे. (Thackeray group leader MP Sanjay Raut attacked Assembly Speaker Rahul Narvekar unconstitutional government in state is protected by this president of Assembly)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप निर्णय तसंच सुनावणी योग्य त्या वेळेत घेतली नसल्यानं, त्यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले. त्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या. आता यावर राऊतांनी घणाघाती टीका केली आहे. राज्यात जे घटनाबाह्य सरकार आहे त्याला या अध्यक्षांचा पाठिंबा आहे. तसंच, विधानसभा अध्यक्षांचा या महाराष्ट्रात एक इतिहास राहिलेला आहे. जितके अध्यक्ष होऊन गेले त्यांनी कायद्याचं रक्षण केलं आणि एक आदर्श घालून दिला. मात्र, दुर्दैवानं मागच्या एक वर्षापासून एक बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकार या राज्यात बसवलं गेलं आणि या घटनाबाह्य सरकारचं संरक्षण करण्याचं काम हे विधानसभेचे अध्यक्ष करत आहेत, असा आरोप राऊतांनी यावेळी केला.

- Advertisement -

एखाद्या खुन्याला संरक्षण द्यावं, आश्रय द्यावा आणि त्या खुन्याला आणखी खून करण्याचं उत्तेजन द्यावं, अशाप्रकाचं काम हे विधानसभेचे अध्यक्ष करत आहेत, असा आरोप राऊतांनी केला. सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांसाठी पोरखेळ हा शब्द वापरते. आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारची भूमिका कधी सर्वोच्च न्यायालयाने घेतली नव्हती. परंतु आता या राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष करत आहेत, असा आरोपही राऊतांनी यावेळी केला.

असं फक्त गुजरातमध्येच होऊ शकतं

आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये पाकिस्तानी संघाचं जोरदार स्वागत करण्यात आलं यावर प्रश्न विचारला असता, राऊत म्हणाले की हे केवळ गुजरातमध्येच होऊ शकतं. देशाचे पंतप्रधान पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक कापतात. त्यामुळे पाकिस्तानचं कौतुक हे केवळ देशात गुजरातमध्ये तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह यांच्या राज्यातच होऊ शकतं, असा आरोपही राऊतांनी केला आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: माझी निवडणुकीची हौस भागली…; उदयनराजेंनी राजकारणातून संन्यास घेण्याचे दिले संकेत )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -