घरताज्या घडामोडीचंद्रकांत पाटलांकडून बाळसाहेबांचा अपमान; हिंमत असेल तर उत्तर द्या; राऊतांचे शिंदे सेनेला...

चंद्रकांत पाटलांकडून बाळसाहेबांचा अपमान; हिंमत असेल तर उत्तर द्या; राऊतांचे शिंदे सेनेला आव्हान

Subscribe

'भाजपाकडून वारंवार बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया द्यावी. तुमच्यात हिंमत असेल तर प्रतिक्रिया द्या. कारण ते गुलाम असून गुलामामध्ये हिंमत नसते. गुलाम हा गुलामच असतो', अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन दिले आहे.

‘भाजपाकडून वारंवार बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया द्यावी. तुमच्यात हिंमत असेल तर प्रतिक्रिया द्या. कारण ते गुलाम असून गुलामामध्ये हिंमत नसते. गुलाम हा गुलामच असतो’, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन दिले आहे. ‘बाबरी ज्यांनी पाडली ते शिवसैनिक नव्हते. त्यावेळेचा ढाचा पडल्यानंतर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब तिथे गेले होते’, असे वक्तव्य भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केले होते. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर हल्लाबोल केला. (Thackeray Group MP Sanjay Raut Slams CM Eknath Shinde)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर हल्लाबोल केला. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा बाबरी पाडण्यामध्ये कोणतीही भूमिका नाही किंवा रोल नाही. त्यांनी कोणतेही श्रेयदान किंवा सरदार पाठवले नव्हते, असे चंद्रकांतम्हणत आहेत. परंतु, सरकारमध्ये जे त्यांच्या मांडिला मांडी लावून बसलेले आहेत. तसेच, डॉ. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 लोकांचे यावर काय म्हणणे आहे. जे काल त्यांच्या चड्डीची नाडी पकडून अयोध्येमध्ये फिरत होते”, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

“आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आहोत. आम्हचीच खरी शिवसेना. हिंदुत्वासाठी आम्ही शिवसेना सोडली असे नेहमी सांगत असतात. त्यांच्याकडून यावर प्रतिक्रिय अपेक्षित आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा इतका मोठा अपमान करण्याची कोणाची हिंमत नव्हती. परंतु, तुम्ही शिवसेना फोडल्यामुळे आणि गुलाम झाल्यामुळे भाजपा नेते चंद्रकांत पाटील किंवा भाजपाचे काही नेते सातत्याने शिवसेनेचा अपमान करत आहेत”, असेही संजय राऊत म्हणाले.

“भाजपाकडून वारंवार बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया द्यावी. तुमच्यात हिंमत असेल तर प्रतिक्रिया द्या. कारण ते गुलाम असून गुलामामध्ये हिंमत नसते. गुलाम हा गुलामच असतो”, असे आव्हान राऊतांनी शिंदेंना दिले.

- Advertisement -

“बाबरी तोडली आणि त्यानंतर भाजपाने पलायन केले हा इतिहास आहे. बाबरी तोडणारे आमचे भाजपाचे किंवा अन्य कोणी नव्हते. बाबरी पाडणारे शिवसैनिक होते. त्यावेळी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांनी जाहीरपणे सांगितल्यानंतर, बाळासाहेब ठाकरेंनी अभिमानाने सांगितले होते की, बाबरी तोडणारे शिवसैनिक असतील तर, त्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते”, असेही संजय राऊत म्हणाले.

“आम्ही पळकुठे नव्हतो आणि नाहीच. पण ज्या पळकुट्यांना सोबत घेऊन महाराष्ट्रात भाजपाने सत्ता स्थापन केली. त्यांची हिंमत आता ऐवढी वाढली की, हिंदुंचे दैवत असलेल्या बाळासाहेब ठाकरेवर चिखलफेक करू लागले आहेत. त्या चिखलात बसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 40 आमदार हे सत्ता भोगत आहेत. हे महाराष्ट्राचे आणि हिंदुत्वाचे दुर्देव आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा – Breaking News : सावरकरांचा जन्मदिवस “स्वातंत्र्यवीर गौरव दिन” म्हणून साजरा करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -