घरक्राइमशिंदे गटातील आमदाराच्या चालकाला बाउन्सरने केली मारहाण, जाणून घ्या कारण काय?

शिंदे गटातील आमदाराच्या चालकाला बाउन्सरने केली मारहाण, जाणून घ्या कारण काय?

Subscribe

ही घटना मुंबईतील लोअर परळ इथल्या ओपा पबच्या आवारात घडली.

शिंदे गटातील एका आमदाराच्या चालकाला मुंबईत एका बाउन्सरने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली असून कोणत्या आमदाराच्या चालकाला मारहाण केली आणि कारण काय याची चर्चा जोरात रंगू लागली आहे.

ही घटना मुंबईतील लोअर परळ इथल्या ओपा पबच्या आवारात घडली. शिंदे गटातील ठाण्याचे आमदार रविंद्र फाटक यांचा मुलगा प्रियांश हा लोअर परेल इथल्या बॉम्बे डाइंग मिलमधील ओपा पबमध्ये आला होता. आमदार रवींद्र फाटक यांच्याकडे गेल्या ६ वर्षापासून प्रशांत पाटील हे चालक म्हणून काम करतात. ७ एप्रिल रोजी रात्री ११ च्या वाजण्याच्या सुमारास ते आमदार रविंद्र फाटक यांचा मुलगा प्रियांशला घेऊन ओरा पबमध्ये आले होते. रात्री उशिरा दोनच्या सुमारास प्रियांश हे घरी जायला निघाले. त्यांनी चालक प्रशांत पाटील यांना गाडी बाहेर काढण्यासाठी सांगितले होते.

- Advertisement -

प्रशांत पाटील मर्सिडिज घेऊन ओपा पबच्या इमारतीखाली थांबले होते. इतक्यात त्यांच्या पाठीमागून दोन गाड्या आल्या. या गाड्या बॉम्बे डाइंग मिलच्या मालकाच्या मुलाच्या होत्या. एका गाडीतून ३ बाउन्सर खाली उतरले आणि गाडी पुढे घेण्यास सांगितले. प्रियांश येणार म्हणून चालकाने आपली गाडी हळूहळू पुढे घेण्यास सुरूवात केली.

हे ही वाचा: “एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ”, CM च्या अयोध्या दौऱ्यावरून ‘या’ नेत्याची टीका

- Advertisement -

तिथे उभा असलेल्या बाउन्सरने चालकासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. प्रियांश गाडीत बसण्यासाठी येत असल्याचंही यावेळी त्या चालकाने सांगितलं होतं. परंतू गाड्या बॉम्बे डाइंग मिलच्या मालकाच्या तीन बाउन्सरनी त्यांची गाडी मध्येच थांबवली. चालकाला गाडीतून बाहेर ओढलं आणि बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. या तीन बाउन्सरच्या तावडीतून आपली कशीबशी सूटका करत ते प्रियांश यांना घेऊन बाहेर आले.

हे ही वाचा: CM एकनाथ शिंदे अयोध्येवरून थेट शेतकऱ्यांच्या बांध्यावर, बळीराजाने मांडली व्यथा

पुढे रस्त्यात त्यांना नाकाबंदी असलेली दिसली. नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांना त्यांनी सर्व घटना सांगितली. पोलीस त्यांना घेऊन पुन्हा घटनास्थळी आले. परंतू त्याआधीच ते तीन बाउन्सर तेथून फरार झाले होते. अखेर प्रशांत पाटील यांनी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेबाबत तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

हे ही वाचा: “राहुल गांधी उद्योगपतींना भेटण्यासाठी परदेशात जातात; गुलाम नबी यांचा दावा

याप्रकरणी रविवारी एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र या प्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील चंद्रमोरे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -