घरमहाराष्ट्रThackeray group : ते बाळासाहेब ठाकरेंचे अस्तित्वच नाकारत आहेत, ठाकरे गटाचा शिंदे...

Thackeray group : ते बाळासाहेब ठाकरेंचे अस्तित्वच नाकारत आहेत, ठाकरे गटाचा शिंदे गटावर प्रहार

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अस्तित्वच नाकारत आहेत आणि ठाण्याच्या एका बिनकामाच्या खोकेवाल्यास शिवसेनेचे निर्माते मानत आहेत. शिवसेनेच्या घटनेचे कागद मिळाले नाहीत यावर आता त्यांची थुकरट प्रवचने नव्याने सुरू झाली. यावर सर्वोच्च न्यायालयाने आधीच ऐकून घेतले आहे. आता लवादाच्या (विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर) मनमानीविरोधात केलेल्या याचिकेवर फक्त निकाल देण्याची वेळ आहे, असे सांगत ठाकरे गटाने शिंदे गट आणि राहुल नार्वेकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

हेही वाचा – Thackeray group : मोदी-शहा घोडेबाजारात बसून सौदे करतायत, ठाकरे गटाचा घणाघात

- Advertisement -

राज्यावर लादलेले सध्याचे घटनाबाह्य सरकार त्वरित बरखास्त करून सर्वोच्च न्यायालयाने न्याय करणे गरजेचे आहे, पण अधर्माची बाजू घेणारे दुतोंडी वकील रोज नवे मुद्दे समोर आणतात आणि वेळकाढूपणा करतात. पुन्हा या सर्व प्रकरणात निवडणूक आयोगाने संशयास्पद भूमिका बजावली. म्हणजे घटनेचा रखवालदारच चोर निघाला. आता चोर मंडळाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्याकडून बनावट दस्तऐवज सादर केले. चोर मंडळाच्या वकिलांची कायद्याची सनद तपासावी असा हा त्यांचा दावा आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून म्हटले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : रात्री उशिरापर्यंत खलबते करूनही खऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदरी निराशाच!

- Advertisement -

महाराष्ट्रातील चोर मंडळाने इंग्लंडच्या राणीचे महागडे वकील त्यांच्या बचावासाठी उभे केले तरी आपला देश स्वतंत्र झाला आहे. हे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले नसून 1947 साली मिळाले आहे. शिवाय या देशाला एक संविधान प्राप्त झाले आहे. त्या संविधानाचे पाय आणि कवचकुंडले मजबूत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अणित शहा यांच्या भाजपाला आणि त्यांच्या अधर्मी चोर मंडळाला देशाचे संविधान खोकेबाजारात अथवा घोडेबाजारात उभे करता येणार नाही, असे ठाकरे गटाने ठणकावून सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालय निकाल देणार नाही, तर न्याय करेल ही आशेची किरणे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या मनात आहेत. न्यायाचा सूर्य मावळणार नाही हे चोर मंडळाने ध्यानात ठेवावे. तारखांचा घोळ संपला की, न्यायाचा सूर्य नक्कीच उगवेल, असा आशावादही ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – BJP vs Thackeray : …म्हणून ‘बंद खोलीतील’ रडगाणे पुन्हा सुरू झाले, बावनकुळेंची ठाकरेंवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -