घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : रात्री उशिरापर्यंत खलबते करूनही खऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या...

Lok Sabha 2024 : रात्री उशिरापर्यंत खलबते करूनही खऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदरी निराशाच?

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकांचे बिगुल आठवड्याभरात वाजण्याची शक्यता आहे. राज्यात सत्ताधारी महायुती तसेच विरोधकांच्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. पण सर्वांचेच लक्ष महायुतीच्या जागावाटपाकडे लागले आहे. काल, शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बंगल्यावर उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरी निराशाच आली.

हेही वाचा – Politics: स्वत:ला स्वाभिमानी म्हणवणारे आता दिल्लीत भांडी घासतायत; राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंसह अजित दादांवर घणाघात

- Advertisement -

आमचीच खरी शिवसेना असे मुख्यमंत्री शिंदे आणि आमचीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असे अजित पवार सांगत असले तरी, जागावाटपामध्ये त्यांचे काहीच खरे नाही, समोर येत असलेल्या माहितीवरून तरी दिसते. शिवसेनेने ज्या जागा लढविल्या आहेत, त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे, अशी भूमिका शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. तर, शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील, तेवढ्याच जागा आम्हालाही हव्यात, असा आग्रह अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी धरला आहे. तर, लोकसभेच्या जागांचा फॉर्म्युला हा चर्चेनंतरच ठरेल, पण जो पक्ष ज्या जागा लढला, त्याला साधारणपणे त्या जागा जाव्यात, हे त्याचे सूत्र असले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. याशिवाय, भाजपा 26 आणि शिवसेना-राष्ट्रवादी मिळून 22 जागा असा फॉर्म्युला असेल, असे फॉर्म्युलाही फडणवीस यांनी सांगितला होता.

प्रत्यक्षात मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच अमित शहा यांच्या निवासस्थानी शनिवारी मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या बैठकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार तोंडावर आपटल्याचे सांगण्यात येते. भाजपा 36 जागांसाठी आग्रही आहे. तर, उर्वरित 12 जागांसाठी शिवसेना 8 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 4 जागांची ऑफर दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यातही तिढा कायम राहिला तर भाजपा जास्तीत जास्त चार जागांवर तडजोड करू शकतो, असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार, शिंदे गटाला 10 ते 12 जागा मिळू शकतात किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा मिळतील.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्षांनी सरळ मनमानी केली आणि…; ठाकरे गटाची टीका

सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 25 तर शिवसेनेने 23 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यावेळी भाजपाने 23 तर, शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने 19पैकी 4 जागा जिंकल्या होत्या. यावरच घोडे अडले आहे. त्याचा विचार करता, आपल्यावर अन्याय झाल्याची भावना शिवसेनेत निर्माण होऊ शकते. कारण, राष्ट्रवादीचे चार खासदार असताना त्यांना तेवढ्याच जागा मिळतील आणि शिवसेनेकडे 13 खासदार असतानाही केवळ 8 आणि जास्तीत जास्त 12 जागा मिळतील, असे सांगण्यात येते.

ठाकरे गटच नव्हे तर, शिंदे गटाच्या जागांवरही भाजपाचा डोळा

महाराष्ट्रातील दक्षिण मुंबई, ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, धाराशिव आणि परभणी या पाच जागांवर ठाकरे गटाचे खासदार आहेत. या जागांवर भाजपाला हव्या आहेत. यापैकी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवरून भाजपा आणि शिवसेनेत वादंग सुरू आहे. दक्षिण मुंबईसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नाव जवळपास निश्चित आहे. ठाणे किंवा कल्याण भाजपाला हवी आहे. कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे खासदार असल्याने कदाचित एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला ठाणे भाजपाला मिळेल, असे सांगितले जाते.

हेही वाचा – Bharat Jodo Nyaya Yatra: राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात, ‘या’ दिवशी होणार समारोप

तर, शिंदे गटाच्या उत्तर पश्चिम मुंबई आणि हिंगोली या दोन जागाही भाजपाला हव्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. तिथे शिंदे गटाचे अनुक्रमे गजानन कीर्तिकर आणि हेमंत पाटील हे खासदार आहेत. त्यापैकी हिंगोली येथे माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार हे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरतील, असा अंदाज आहे.

10 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती?

सन 2014मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजपाने सहज विजय मिळविला होता. त्यामुळे त्याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी जागावाटप करताना भाजपाने ताठर भूमिका घेतली होती. परिणामी 25 वर्षांची युती तुटली आणि शिवसेना व भाजपाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. आताही भाजपाच्या कथित ताठर भूमिकेवर एकनाथ शिंदे आणि अजित पवार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Politics : शिंदे गटाच्या जागांवर भाजपाचा ताबा? महायुतीत शिंदे-अजित पवार गटाचे नुकसान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -