घरमहाराष्ट्रव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त सापडेना

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त सापडेना

Subscribe

कधी जेईई परीक्षा तर कधी राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा यामुळे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा विलंबाने झाल्या. या परीक्षांसह एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल १५ सप्टेंबरला जाहीर झाला, मात्र कृषी व फाईन आर्ट्स वगळता सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

कधी जेईई परीक्षा तर कधी राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा यामुळे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा विलंबाने झाल्या. या परीक्षांसह एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल १५ सप्टेंबरला जाहीर झाला, मात्र कृषी व फाईन आर्ट्स वगळता सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे निकाल तर लागला, पण आता प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माण शास्त्र, आर्किटेक्चर, विधी अशा अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलमार्फत राबवली जाते. बारावीचा निकाल लागल्यानंतर लगेचच ही परीक्षा घेण्यात येते, मात्र यंदा जेईई, नीट व राज्यातील विविध विद्यापीठांच्या परीक्षांमुळे सीईटीकडून परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्याने परीक्षेला विलंब झाला, मात्र ऑगस्टमध्ये सर्व परीक्षा घेत सीईटी सेलकडून तातडीने निकालही लावण्यात आले. २ ते १५ सप्टेंबरदरम्यान सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले.

- Advertisement -

मात्र कृषी व फाईन आर्ट्स अभ्यासक्रम वगळता सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सीईटी सेलकडून अद्याप जाहीर करण्यात आले नाही. विलंबाने परीक्षा होऊनही सीईटी सेलकडून निकाल तातडीने लावण्यात आला. राज्यातील ७ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा दिल्या आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष सीईटी सेलच्या वेळापत्रकाकडे लागले आहे. असे असताना प्रवेश परीक्षा राबवण्यात विलंब का होत आहे, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. सीईटी सेलकडून मात्र याबाबत काहीही हालचाल होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -