घरमहाराष्ट्रनाशकातील मद्यतस्करीचे धागेदोरे पोहोचले नगरच्या विखे-पाटील साखर कारखान्यापर्यंत

नाशकातील मद्यतस्करीचे धागेदोरे पोहोचले नगरच्या विखे-पाटील साखर कारखान्यापर्यंत

Subscribe

सॅम्पलच्या अहवालानंतर ठरणार कारवाईची दिशा, मद्य व्यावसायिक अतुल मदनला जामीन

नाशिकमधल्या मद्य तस्करीचे धागेदोरे थेट नगर जिल्ह्यातल्या विखे-पाटलांच्या साखर कारखान्यापर्यंत पोहोचले आहेत. उत्पादन शुल्क विभागाने कारखान्यातील नमूने ताब्यात घेतले असून, ते अवैध मद्यसाठ्याच्या नमुन्यांशी जुळले तर थेट कारखान्यावरच कारवाई केली जाईल, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंचुले यांनी दिलीय.

नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिंडोरी तालुक्यातून लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त केला होता. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या उत्पादन शुल्क विभागानं या प्रकरणात मद्यव्यावसायिक अतुल मदन याची मद्याची १४ दुकानं सील केली होती. याप्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात मदनला जामीन मंजूर होतो न होतो, तोच आता अवैध मद्य तस्करीचे धागेदोरे थेट नगर जिल्ह्यातल्या प्रसिद्ध विखे-पाटील साखर कारखान्यापर्यंत पोहोचले आहेत. उत्पादन शुल्क विभागानं अवैध मद्याचा साठा आणि संबंधित साखर कारखान्यातल्या मद्याचे नमूने घेतले आहेत. ते दोन्हीही सारखे निघाले तर मात्र थेट कारखान्यावरच कारवाई होणार असल्याची माहितीही अधीक्षक अंचुले यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -