घरक्राइममंगरुळपीर शहरात उरुसाच्या रॅलीत औरंगजेबाचा फोटो आणि पाकिस्तानचे झेंडे; दोघांना अटक

मंगरुळपीर शहरात उरुसाच्या रॅलीत औरंगजेबाचा फोटो आणि पाकिस्तानचे झेंडे; दोघांना अटक

Subscribe

मंगरुळपीर शहरात शनिवारी उरूसाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीत औरंगजेबाचा फोटो आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यातत आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मंगरुळपीर शहरात शनिवारी उरूसाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीत औरंगजेबाचा फोटो आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यातत आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (the flag of Pakistan and seen holding Aurangzeb photo in washim)

या व्हायरल व्हिडीओमध्ये उरूसानिमित्त निघालेल्या रॅलीत काही जण औरंगजेबाचा फोटो हातात घेऊन नाचताना दिसत आहेत. तसेच, काही जण पाकिस्तानचे झेंडे झळकावत आहेत. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून, काही संघटनांनी औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा बनवून त्याचे दहन केले.

- Advertisement -

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. पोलिसांनी या प्रकाराची तपासणी करत 2 जणांना अटक केली आहे. 14 तारखेला निघालेल्या मिरवणुकीत काहींनी औरंगजेबाचे फोटो झळकावत घोषणाबाजी केली.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राज्यात औरंगजेबावरून वाद सुरू आहे. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते असे वादग्रस्त विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आले तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचे मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचे मंदिरही फोडले असते असे आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

त्यानंतर भाजपाने आव्हाडांबद्दल आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबजी असा उल्लेख केल्याने विरोधकांनी भाजपावर टीका केली.


हेही वाचा – मला धमकी आली की नाही, हे नॉट रिचेबलवरून कळलं असेल – शुभांगी पाटील

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -