घरमहाराष्ट्ररस्त्यांवरून जुंपली! महापालिका म्हणते खड्डे आम्ही बुजवायचे आणि महसूल तुमच्या खिशात; MMRDA,...

रस्त्यांवरून जुंपली! महापालिका म्हणते खड्डे आम्ही बुजवायचे आणि महसूल तुमच्या खिशात; MMRDA, MSRDC ला सुनावलं

Subscribe

रस्त्यांची जबाबदारी, दुरुस्ती, त्यासाठी होणारा खर्च आणि जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न यावरून मुंबई महापालिकेने नाराजीचा सूर आवळला आहे. रस्ते दुरुस्तीचा खर्च आम्ही करायचा आणि जाहिरातीतून मिळणारं उत्पन्न मात्र MMRDAच्या खिशात का? असा सवाल महापालिकेने उपस्थित केला आहे.

मुंबई: रस्त्यांची जबाबदारी, दुरुस्ती, त्यासाठी होणारा खर्च आणि जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न यावरून मुंबई महापालिकेने नाराजीचा सूर आवळला आहे. रस्ते दुरुस्तीचा खर्च आम्ही करायचा आणि जाहिरातीतून मिळणारं उत्पन्न मात्र MMRDAच्या खिशात का? असा सवाल महापालिकेने उपस्थित केला आहे.

महापालिका म्हणते महामार्ग, उड्डाणपुलांची देखभाल, देखरेख आम्ही करायची. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवायचे आम्ही. टीकाही आम्हीच झेलायची. महसूल मात्र तुमच्या तिजोरीत. आधी महसुलाचे बोला अन्यथा उड्डाणपुलांची जबाबदारी घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत मुंबई महापालिकेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळांना (MSRDC)सुनावलं आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ; आरक्षणाच्या मागणीवर ठाम )

मुंबई शहर आणि उपनगरातील काही रस्त्यांची जबाबदारी पूर्वी MMRDA, सार्वजनिक बांधकाम खात्याकडे होती. अलीकडच्या काळात या जबाबदारीतून या दोन्ही यंत्रणांनी अंग काढून घेतलं. या दोन्ही यंत्रणांकडे रस्त्यांची जबाबदारी असतानाही खड्ड्यांसाठी मात्र पालिकेला टीकेचं धनी व्हावं लागत होतं. आता दुरुस्तीची जबाबदारी पुन्हा पालिकेकडे आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलांच्या देखभालीची जबाबदारी घ्या, असं एमएसआरडीसीने पालिकेला सांगितलं आहे. मात्र, ही जबाबदारी घेण्यास पालिकेने साफ नकार दिला आहे. जोपर्यंत महसुलाचं प्रकरण निकालात निघत नाही, तोपर्यंत आम्ही उड्डाणपूल ताब्यात घेणार नाही, असं आम्ही एमएसआरडीसीला स्पष्टपणे कळवलं आहे.

(हेही वाचा: सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ; आरक्षणाच्या मागणीवर ठाम )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -