Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र भाजपच्या 'या' आमदाराचा पुतण्या आज ठाकरे गटात प्रवेश करणार

भाजपच्या ‘या’ आमदाराचा पुतण्या आज ठाकरे गटात प्रवेश करणार

Subscribe

अहमदनगर : महाराष्ट्रच्या राजकारणात काका-पुतण्याचे राजकारण काही नवीन नाही. मग बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे असो की, शरद पवार-अजित पवार असो. राज्याच्या राजकारणत काका-पुतण्यांचा वाद कायम बघायला मिळाला आहे. यामुळे आता पाचपुते कुटुबांतील काका-पुतण्याच्या वादाची भर पडणार आहे. साजन पाचपुते हे आज सायंकाळी पाच वाजता मुंबईत ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचे भाऊ सदाअण्णा पाचपुते यांच्या निधनानंतर पाचपुते कुटुंबात फूट पडली. गेल्या काही महिन्यांपूर्वी काष्टी गावात झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत साजन पाचपुते विरुद्ध प्रतापसिंह बबनराव पाचपुते या दोघांमध्ये लढत पाहायला मिळाली. तसेच श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत साजन पाचपुतेंनी बबनराव पाचपुते यांच्या विरुद्ध जिंकली होती.

- Advertisement -

हेही वाचा – …म्हणून शांततेने सुरू असलेले मराठा आंदोलन चिरडण्याचा निर्णय, ठाकरे गटाचा थेट आरोप

तसेच साजन पाचपुतेंनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेटी घेतली होती. त्यावेळी साजन पाचपुते हे शिंदे गटात सामील होणार का?, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यानंतर गेल्या महिन्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची साजन पाचपुते यांची भेट घेतली. यानंतर साजन पाचपुते हे ठाकरे गटात जाणार असल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisement -

हेही वाचा – ज्यांनी लाठीचार्जचे आदेश दिले त्यांना मराठवाडा बंदी करा; राज ठाकरेंचे आंदोलकांना आवाहन

नगरमध्ये ठाकरेचे वर्चस्व वाढण्यास मदत होणार

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि भाजपचे वर्चस्व वाढत असलेल्या नगरजिल्ह्यात ठाकरे यांची पिछाडीवर गेला असून या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात नवीन चेहरे आणण्यास सुरुवात केल्याचे दिसून येईल. शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांच्यासमर्थकांसह 23 ऑगस्टला ठाकरे गटात प्रवेश केला.

 

- Advertisment -