घरमहाराष्ट्र'इंडिया' नावाला टींब लावून विरोधकांच्या आघाडीने दुष्कृत्य केलं; भाजपाकडून मुंबईतील बैठकीवर हल्लाबोल

‘इंडिया’ नावाला टींब लावून विरोधकांच्या आघाडीने दुष्कृत्य केलं; भाजपाकडून मुंबईतील बैठकीवर हल्लाबोल

Subscribe

मुंबई : सत्ताधारी पक्षाच्या एनडीए (NDA) आघाडीला आव्हान देण्यासाठी आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या ‘इंडिया’ (India) आघाडीची एकजूट बांधण्याचा प्रयत्न होत आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईत आज (31 ऑगस्ट) आणि उद्या (1 ऑगस्ट)  ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला प्रत्युत्तर देण्यासाठी महायुतीकडून देखील आज आणि उद्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोर-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी (ChandraShekhar Bawankule) ‘इंडिया’ आघाडीच्या नावावरच टीका केली आहे. (The opposition alliance committed a crime by using the name India BJP will attack the meeting in Mumbai)

हेही वाचा – Sanjay Raut : इंडिया आघाडीची ताकद बघून चीनही मागे हटेल; संजय राऊतांना विश्वास

- Advertisement -

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विरोधकांनी त्यांच्या आघाडीला दिलेल्या नावाला मान्यता मिळाली असली तरी त्यांनी ‘इंडिया’ नावाला टींब टींब लावून दुष्कृत्य केलं आहे. ‘इंडिया’ नावाला टींब लावणे योग्य नाही. ‘इंडिया’ आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे, पण 26-28 पक्षांपैकी काही पक्ष असे आहेत की, ज्याचं एक मत नाही. फक्त मोदींचा विरोध करण्याकरता 2014 किंवा 2019 प्रमाणे पुन्हा एकदा प्रयोग करत आहेत. विरोधकांकडून बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, पण याची दारू केव्हाच निघाली आहे. त्यांचा फुसकी बॉम्ब झाला आहे. हा बॉम्ब काही कामाचा नाही आहे. अनेक नेते दुरावलेले आहेत. ते आज एकत्र येत असले तरी त्यांची तोंड विरुद्ध दिशेने आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पूर्णपणे गेलेला आहे. देशात जिंकून येण्यासाठी युती करत आहेत, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

हेही वाचा – “लवकर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचे मनपरिवर्तन होऊन…”, चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे विधान

- Advertisement -

बावनकुळेंनी उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीला केले लक्ष्य

मुंबईत ‘इंडिया’ आघाडीची बैठक नाही तर ‘घमेंडिया‘ची बैठक होत आहे, असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. यावेळी उद्धव ठाकरेंवर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे ज्याला ‘गरूड झेप‘ म्हणत आहात ती गरुड झेप नाही. मोदी यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांची टोळी आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना याच टोळीने शंभर कोटी वसुली केली होती. कोरोना काळात कोट्यवधीची कंत्राट घशात घातली. मृतदेहांसाठीच्या बॅगही त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -