घरमहाराष्ट्रनाशिकआरोग्य विद्यापीठातील प्रस्तावित योग पदवीचा श्वास ४ वर्षापासून कोंडला

आरोग्य विद्यापीठातील प्रस्तावित योग पदवीचा श्वास ४ वर्षापासून कोंडला

Subscribe

नाशिक : योगशास्त्राचे जगभरातील वाढते महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ’बॅचलर इन योगा अँड नॅचरोपॅथी’ हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेतला खरा; मात्र त्यासाठी सक्षम पाठपुरावाच न झाल्याने योगाच्या पदवीचा योग आजवर जुळून आलेला नाही. हा योग जुळला असता तर विद्यार्थ्यांना बारावीनंतर पदवीसाठी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्ससोबतच योगशास्त्रातही पदवीचे शिक्षण घेण्याचा पर्याय मिळाला असता. आरोग्याप्रती सजगता निर्माण होऊन, निरामय राष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी योगाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे.

योगा विषयाचे शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाने योग विषयात पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय २०१९ ला घेतला होता. त्यावेळी केलेल्या नियोजनानुसार, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ’बॅचलर इन योगा अँड नॅचरोपॅथी’ या चार वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार होता. हा पदवी अभ्यासक्रम शिकवण्याची इच्छा दर्शवणार्‍या वैद्यकीय महाविद्यालयांनी व खासगी शिक्षण संस्थांनी विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केलेत. यामुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम महाराष्ट्रात सर्वत्र सुरू होईल अशी अपेक्षा होती.

- Advertisement -

चार वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी एका महाविद्यालयात 60 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार होता. त्यांचे शैक्षणिक शुल्क मर्यादित राहणार होते. शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, फेलोशिप देण्याचा विचार विद्यापीठाने केला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्ट्स, कॉमर्स व सायन्य या विद्याशाखांसोबतच योगा विषयाचा उत्तम पर्याय उपलब्ध होईल, अशी आशा विद्यार्थ्यांना लागली होती. परंतु कोविडच्या काळात योगा पदवीकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतरही विद्यापीठाकडून पुरेसा पाठपुरावा न झाल्याने हा चांगला अभ्यासक्रम केराच्या टोपलीत टाकला गेला आहे.

फेलोशिपलाही अल्प प्रतिसाद

आरोग्य विद्यापीठातर्फे चालवण्यात येणार्‍या योग पदविका (एक वर्ष) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची फेलोशिप देण्यात येते. सहा वर्षापासून हा अभ्यासक्रम चालवण्यात येत असून, आजवर शंभर विद्यार्थ्यांनीही या फेलोशिपचा लाभ घेतलेला नाही.

- Advertisement -

हे आहे कारण? 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळते. आरोग्य विज्ञान विद्यापीठासाठी मात्र अशी स्वतंत्र कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे योगसारखे विषय मागे पडतात. शिवाय योग हा आयुर्वेदाशी संबंधित विषय असल्याचा दावाही काहींकडून केला जातो. तर योगाला शास्त्रीय आधार काय, असा दावाही काही ‘अतिहुशार तज्ज्ञां’कडून केला जातो. या दाव्या- प्रतिदाव्यांमध्ये योगाचा श्वास कोंडला जात असल्याकडे कुणी लक्ष देत नाही, हे विशेष.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -