घरमहाराष्ट्रपूरग्रस्तांना धीर देण्यासाठी महिला आयोग सरसावला

पूरग्रस्तांना धीर देण्यासाठी महिला आयोग सरसावला

Subscribe

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पूरग्रस्त सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना भेट देऊन महिलांना आवश्यक वस्तू दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पूरग्रस्त सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना भेट देऊन लोकांना धीर दिला. महिलांना आवश्यक वस्तू यावेळी देण्यात आल्या. तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी, शासकीय यंत्रणांशीही मदत कार्याबाबत चर्चा केली. दोन दिवसाच्या दौऱ्यावर असलेल्या आयोगाच्या अध्यक्षांनी सांगली जिल्ह्यात सांगलीवाडी, शहर बाजारपेठ परिसर, हरिपूर या भागांत पाहणी करुन नागरिकांची विचारपूस केली. सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्याशी पूर ओसरल्यानंतरची परिस्थिती, मिळणारी मदत याबाबत चर्चा केली.

कोल्हापुर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीत पाहणी करुन गावात साफसफाईसाठी आलेल्या राज्यातील लोकांच कौतुक केले. ग्रामीण भागातील अकिवाट, कुरुंदवाड, खिद्रापुर येथील लोकांशी संवाद साधत धीर दिला. राधानगरी आणि करवीर तालुक्यात हळदी, आरे, राशिवडे गावात घरोघरी जात महिलांच्या समस्या समजून घेतल्या. यासर्व गावात महिलांना अंतर्वस्त्र, ब्लाऊज, साडी, परकर, सॅनिटरी पॅड, ब्लॅंकेट यांचे संच यावेळी देण्यात आले. शाळा पुन्हा सुरु झाल्यानंतर लहान मुलांना आवश्यक शैक्षणिक साहित्यही देण्यात आले.

- Advertisement -

याआधी आयोगाकडून पूर ओसरल्यानंतर आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकिन्स तसेच वृद्धांकरिता ॲडल्ट डायपरची गरज भासू शकते, याचा विचार करुन १० हजार सॅनिटरी पॅडस, २ हजार ॲडल्ट डायपर देण्यात आले होते. शासन या परिस्थितीबाबत संवेदनशील असून महाराष्ट्र शासनाने तातडीने दिलेली पाच हजारांची रक्कम, जीवनावश्यक वस्तू लोकांना पोहोचल्यानंतर आता सविस्तर पंचनामे सुरु आहेत. यातून पुढच्या टप्प्यातील मदत आणि पुनर्वसन कार्य वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी पूरग्रस्तांना दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -