घरमहाराष्ट्रCorona: 'डिसेंबरमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता मात्र पुणे पालिका प्रशासन सज्ज'

Corona: ‘डिसेंबरमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता मात्र पुणे पालिका प्रशासन सज्ज’

Subscribe

मुंबई पाठोपाठ पुणे शहरामध्ये आता कोरोना वायरसच्या फैलावाची गती मंदावली आहे.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरू असून देशात कोरोना बाधितांचा आकडा ८० लाख पार झाला आहे. मात्र मुंबई पाठोपाठ पुणे शहरामध्ये आता कोरोना वायरसच्या फैलावाची गती मंदावली आहे. नवे रूग्ण वाढण्याचा दर कमी झाला असून रूग्ण सुधारण्याचा दर देखील आता वाढत आहे. दरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार देशामध्ये पुन्हा कोरोनाची लाट येऊ शकते. या दृष्टीने पालिकेने तयारी केली आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

पुण्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा ३,२१,३९८ पर्यंत पोहचला आहे. यामध्ये ७७९८ लोकांचा बळी गेला आहे. मागील काही महिन्यात अपुरे बेड, वेळेत अ‍ॅम्ब्युलंस न मिळाल्याने काही रूग्ण दगावल्याचं समोर आल्यानंतर प्रशासनावर चौफेर टीका करण्यात आली होती. मात्र आता परिस्थिती सुधारल्याचे महापौरांचे मत आहे. सध्या महाराष्ट्राचा एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १६,६०,७६६ पर्यंत पोहचला आहे.

पुणे शहरातच महाराष्ट्रातील पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर बघता बघता संपूर्ण शहर कोविड १९ चा सावटाखाली आले. सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या असलेले पुणे शहर हळूहळू सावरले आहे. सध्या पुण्याचा कोरोनामुक्त होण्याचा दर देशात सर्वाधिक पुणे शहरामध्ये आहे.


दिलासा! भारतातील Corona चाचण्या अंतिम टप्प्यात; डिसेंबपर्यंत येणार लस!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -