घरताज्या घडामोडीसमृद्धी महामार्गाच्या धर्तीवर होणार कोकण ग्रीनफिल्ड महामार्ग

समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर होणार कोकण ग्रीनफिल्ड महामार्ग

Subscribe

या महामार्गामुळे कोकणातील हापूस आंबा, काजू, सुपारी, नारळ आदी उत्पादनांना थेट आंतराराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल, असं शिंदे म्हणाले.

मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या धर्तीवर कोकणात ग्रीनफिल्ड महामार्ग बांधण्यात येणार असल्याची घोषणा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. उरणमधील चिर्ले ते सिंधुदुर्गातील पत्रादेवी असा ५०० किलोमीटर लांबीचा हा ग्रीनफिल्ड महामार्ग असेल. हा महामार्ग रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरून जाईल. यामुळे कोकणच्या पर्यटनाला चालना मिळणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.


हेही वाचा – ‘मी होतो म्हणून थोडक्यात वाचले शरद पवार…!’

शिवडी ते न्हावाशेवा बंदर हा महामार्ग ज्या भागात संपतो त्या परिसरातील चिर्ले गावातील महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवीपर्यंत हा महामार्ग असेल. या महामार्गाची आखणी कोकण किनारपट्टीवरून करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कोकणचे निसर्गसौंदर्य पाहता येईल. परिणामी पर्यटनाला चालना मिळेल. याशिवाय कृषी उद्योगालाही चालना मिळावी, अशी अपेक्षा महामार्गाच्या निर्मितीमागे आहे. या महामार्गामुळे कोकणातील हापूस आंबा, काजू, सुपारी, नारळ आदी उत्पादनांना थेट आंतराराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल, असे शिंदे म्हणाले.
स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास हा महामार्ग कोकणच्या विकासाचा महामार्ग ठरेल. या महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास तांत्रिक आणि वित्तीय सुसाध्यता अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गापेक्षा हा वेगळा महामार्ग असल्यामुळे वाहतुकीचा ताण कमी होईल, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -