घरमहाराष्ट्र'या' योजनेमुळे कोल्हापूरकरांचा पाणीप्रश्न सुटला; ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर सतेज पाटील म्हणाले...

‘या’ योजनेमुळे कोल्हापूरकरांचा पाणीप्रश्न सुटला; ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर सतेज पाटील म्हणाले…

Subscribe

कोल्हापूर : कोल्हापूरत थेट पाईपलाईन प्रकल्प हा पूर्ण झाला आहे. यामुळे कोल्हापूरकरांना दररोज 200 लिटर पाणी मिळणार आहे. कोल्हापूरात थेट पाईपलाईन योजना पूर्ण केल्याबद्दल काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर राज्यातील सर्व राजकीय नेते कौतुक करत अभिनंदन करत आहेत. सतेज पाटील यांच्या मनात काय असते, कोणाला काही कळत नाही. त्यांनी जे ठरवले आहे ते घडवून आणतात, अशा शब्दात शाहू महाराज छत्रपती यांनी थेट पाईपलाईन वचनपूर्ती लोकसोहळ्याच्या कार्यमातून सतेज पाटील यांचे कौतुक केले आहे.

थेट पाईपलाईन ही योजना केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची काँग्रेसची सत्ता असताना आली होती आणि राज्यात मी मुख्यमंत्री असताना थेट पाईपलाईन योजनेचे भूमीपूजन केले होते. पाणी आले नाही तर निवडणुकीला उभाणार नाही, असे सतेज पाटील तेव्हा म्हणाले होते, असे म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सतेज पाटील यांचे कौतुक केले आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “राज्यात काँग्रेसची सत्ता असताना कोल्हापूर महापालिकेत सतेज पाटील यांची सत्ता होती. तेव्हा थेट पाइपलाइन योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेचा पाठपुराव्यामुळे केंद्रात योजनेच्या 60 टक्के हिश्याचे 170 कोटी महापालिकेच्या खात्यावर जमा झाले होते. पण आमचे सरकार गेल्यानंतर अनेकांनी थेट पाईपलाईन प्रकल्पाला स्थगिती मिलाली. यामुळे अनेक अडचणी येत गेल्या. पण सतेज पाटील यांच्या चिकाटीमुळे थेट पाईपलाईन ही योजना मार्गी लागली.”

- Advertisement -

हेही वाचा – न्यायालयात उशिरा येणे पोलिसांना पडले महागात, गवत कापण्याची मिळाली शिक्षा; काय आहे प्रकरण?

कोल्हापूरकरांचा 50 वर्षांचा पाणी प्रश्न मिटला

थेट पाईपलाईन प्रकल्प हा सतेज पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे बोलले जाते. काळमावाडी थेट पाईपलाईन हा प्रकल्प आता पूर्ण झाला आहे. यामुळे आता काळमवाडीचे पाणी पुइखडी येथे केंद्रावर आल्यानंतर येथून थेट पाईपलाईनच्या माध्यमातून संपूर्ण कोल्लापुरात पोहोचणार आहे. यामुळे कोल्हापूरकरांचा पुढील 50 वर्षांचा पाणी प्रश्न मिटला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बा, विठ्ठला…, आषाढी असो की कार्तिकी फडणवीसांचीच ‘बाजी’, यंदाही महापूजेचा मान

ड्रीम प्रोजेक्टसंदर्भात सतेज पाटील म्हणाले…

या योजना पूर्ण झाल्यावर सतेज पाटील म्हणाले, “कोल्हापूरला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करणारी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना सातत्याने पाठपुरावा करून पूर्णत्वास आणली. या योजनेवरून विरोधकांनी माझ्यावर केलेली टीका ही माझ्या फायद्यासाठी ठरली. थेट पाईपलाईन योजना पूर्ण न झाल्यात त्याला सतेज पाटील जबाबदार असणार असेही काहींनी म्हटले होते आणि आता ही योजना पूर्ण झाली तरी याला सतेज पाटील जबाबदार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -