घरमहाराष्ट्रनाशिकछगन भुजबळ यांना ठार मारण्याची धमकी!

छगन भुजबळ यांना ठार मारण्याची धमकी!

Subscribe

नाशिक : राज्यामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडतायेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे नेतृत्वात पक्षात मोठी फूट पडली आहे. या सर्व घडामोडीच्या केंद्रस्थानी अजित पवार यांच्या सोबतच छगन भुजबळ ही असल्याचं बघायला मिळत आहे. यातच आता छगन भुजबळ यांच्या बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या छगन भुजबळ यांना थेट जीवे मारण्याचे धमकी मिळाल्याची बाब समोर आली आहे. याबाबत पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री छगन भुजबळ यांच्या कायम सोबत असणारे संतोष गायकवाड यांच्या फोनवर सोमवारी (दि.१०) एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि त्या माध्यमातून थेट छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने ‘आपल्याला छगन भुजबळ यांना मारण्याची सुपारी मिळाली आहे आणि आपण सांगूनच काम करत असतो’ अशा पद्धतीची बतावणी केली.

- Advertisement -

छगन भुजबळ एक दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. या पुण्यात दौऱ्या वेळीच संतोष गायकवाड यांच्या फोनवर अशा प्रकारचा अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि त्याने छगन भुजबळ यांना मारणार असल्याचे सांगितले. त्यावर गायकवाड यांनी त्याला विचारणा केली की ‘कशासाठी भुजबळ यांना मारायचे आहे त्यांनी तुझे काय बिघडवले ?’ त्यावर त्या व्यक्तीने मला माहित नसल्याचे सांगितले. दरम्यान, या सर्व घडलेल्या प्रकाराबाबत छगन भुजबळ यांच्या वतीने पुणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून तात्काळ तपासाची चक्र फिरवण्यात आली आणि ज्या नंबर वरून फोन आला होता तो नंबर ट्रेस करण्यात यश मिळाले आहे.

मंत्री भुजबळ यांना धमकी मिळाल्याची तक्रार प्राप्त होताच पुणे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि फोन नंबर ट्रेस करून हा फोन कोकणातून आला असल्याचे समजले. तात्काळ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याला त्याला ताब्यात घेतल्याचे समजते. या व्यक्तीचे नाव प्रकाश पाटील असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान छगन भुजबळ आज पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत या सर्व घडलेल्या घटनेबाबत पुणे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -