प्रादेशिक परिवहन अधिकारी कळसकर यांची बदली

नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर आणि उपप्रादेशिक अधिकारी विनय अहिरे यांची मुंबई येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे बंदली करण्यात आली आहे.
कळसकर यांचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणत्याही अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. कळसकर यांच्याकडे धुळयाचाही अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला होता. नाशिक येथे कार्यरत असतांना रस्ता सुरक्षा अभियान, वाहन तपासणीची स्वयंचलित यंत्रणा त्यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आली. आरटीओच्या कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारीमुळे आयुक्तालयाकडून करण्यात आलेल्या चौकशी प्रकरणाने कळसकर चर्चेत आले होते.