घरमहाराष्ट्रअंत्यविधीसाठी जागा द्यावी, तृतीयपंथीयांची मागणी

अंत्यविधीसाठी जागा द्यावी, तृतीयपंथीयांची मागणी

Subscribe

पुरुष महिलांप्रमाणेच अत्यंसस्कार करण्यासाठी जागा द्यावी अशी मागणी तृतीयपंथीयांनी केली. सामाजिक संस्थेच्या मार्फत ही मागणी करण्यात आली.

तृतीयपंथीयांना प्रेत पुरण्यासाठी व अंत्यविधी करण्याकरिता महापालिका क्षेत्रात जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी निसर्ग तृतीयपंथी विकास फाऊंडेशनतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे करण्यात आली. तृतीयपंथीयांना रहिवाशी भागात मुलभुत सुविधा उपलब्ध नाहित. मृत्यू पश्चात प्रेतावर अंत्यसंस्कार करण्याची प्रथा नसल्याने प्रेत दफन करावे लागते. मात्र, प्रेत पुरण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रेत पुरण्यासाठी जागा मिळावी, यासाठी संघटनेतर्फे अनेकदा निवेदने देवूनही त्यावर निर्णय झालेला नाही. तृतीयपंथीयांना तत्काळ दफनविधीसाठी जागा न दिल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देखील निसर्ग तृतीयपंथ विकास फाऊंडेशनने दिला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -