घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राअंतर्गत प्रवास होणार सुलभ; रस्ते, हवाई, मेट्रो, लोकल कनेक्टसाठी तरतुद

महाराष्ट्राअंतर्गत प्रवास होणार सुलभ; रस्ते, हवाई, मेट्रो, लोकल कनेक्टसाठी तरतुद

Subscribe

नव्या एअरपोर्टच्या विकासासह, रस्ते सुधारणा प्रकल्पासाठी हायब्रिड अॕन्युईटी मॉडेलचा वापर करण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

राज्यातल्या शहरांपासून ते खेडी कनेक्ट करण्याचे उदिष्ट ठेऊन वाहतूक व्यवस्था प्रकल्पांना अंतरीम अर्थसंकल्पातून आधार देण्यात आला आहे. नव्या एअरपोर्टच्या विकासासह, रस्ते सुधारणा प्रकल्पासाठी हायब्रिड अॕन्युईटी मॉडेलचा वापर करण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

१० हजार किलोमीटरचा रस्तेविकास

रस्ते  विकासासाठी महाराष्ट्रातही हायब्रीड अॕन्युईटी मॉडेलचा वापर करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १० हजार ५०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या सुधारणांसाठी आजच्या अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली आहे. हायब्रिड अॕन्युईटी अंतर्गत ३० हजार कोटी किंमतीची कामे मंजूर झाले आहेत. वर्ष २०१९ – २० शाळांसाठी ३ हजार ७०० कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

- Advertisement -

खेड्यांची कनेक्टिव्हीटी

खेडी जोडण्यासाठीचा महत्वाचा अशी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी २ हजार १६४ कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारचे ३० हजार किलोमीटरचे रस्त्याच्या बांधकामाचे उदिष्ट आहे. त्यापैकी २२ हजार ३६० किलोमीटरचे रस्ते मंजुर करण्यात आले आहेत. सुमारे ६ हजार ३४४ किलोमीटर रस्त्याची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

विमानतळांचा विकास

पुणे येथे नवीन विमानतळ, अमरावती, चंद्रपूर, सोलापूर या शहरातील विमानतळांचा विकास करण्यात येणार आहे. राज्यात अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग शहरातील विमानतळांच्या विकासाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. उडाण योजनेअंतर्गत २०१९-२० मध्ये ६५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisement -

रो रो जेट्टी विकास

वर्ष २०१९ – २० मध्ये रेडिओक्लब, नरीमन पॉईंट, मोरा व एलिफंटा येथे प्रवासी व पर्यटकांकरिता जेट्टी बांधण्याची कामे प्रस्तावित आहेत. तसेच सागरमाला योजनेअंतर्गत सागरी किनारपट्टीवरील बंदरांमध्ये प्रवासी जलवाहतूकीसाठी वसई, भाईंदर, खारवाडेश्वरी, मनोरी, घोडबंदर, नारंगी, मालवण, बोरिवली व गोराई, आंबडवे येथे रो रो जेट्टी बांधण्याची कामे प्रगतिपथावर आहेत.

रेल्वे, मेट्रो विकास

मेट्रोचे जाळे ठाणे, मिरा भाईंदर, वसई विरार, कल्याण डोंबिवली, भिवंडीपर्यंत पसरवण्याचे महत्वकांशी प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतले आहेत. मुंबईत एमएमआरडीएच्या सहभागातून २७६ किलोमीटर लांबीच्या मेट्रो आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. नागपुर, पुणे, नवी मुंबई महानगरांमध्ये मेट्रो रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आले होते. १४१.०६ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग बांधण्यात येणार आहेत. उपनगरीय लोकल रेल्वेतील सुधारणांसाठी मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा ३ अ प्रकल्पाअंतर्गत ५५ हजार कोटी रूपयांचे प्रकल्प मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने हाती घेतले आहेत.


हेही वाचा – राज्याच्या अर्थसंकल्पात काय आहे महत्त्वाचं? वाचा फक्त मुद्दे!

हेही वाचा – Maharashtra Budget 2019 : आ. प्रकाश गजभियेंचे पुन्हा वेषांतर नाट्य


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -