घरमुंबईअन बाबा म्हणतात; 'अर्थमंत्र्यांचे भाषण एकूण आली डुलकी'!

अन बाबा म्हणतात; ‘अर्थमंत्र्यांचे भाषण एकूण आली डुलकी’!

Subscribe

राज्याचा अंतिरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. पण त्यांचे ही भाषणबाजी ऐकून चक्क बाबांना सभागृहात डुलकी आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आज राज्याचा अंतिरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. कवितांचे संदर्भ देत सुधीर मुनगंटीवार यांनी उत्स्फूर्तपणे हा अर्थसंकल्प मांडला खरा पण त्यांचे ही भाषणबाजी ऐकून चक्क बाबांना सभागृहात डुलकी आली. आता तुम्ही म्हणाल हे बाबा कोण? अहो हे बाबा म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी आजचे अंतिरिम अर्थसंकल्प बजेट नेमकं कसे वाटले असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावेळी गमतीने पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की काय सांगू तुम्हाला अर्थमंत्र्यांच्या भाषणात काही नवे मुद्देक नव्हते एवढंच नाही तर काही नवीन घोषणा देखील नव्हत्या त्यामुळे हे रटाळ भाषण ऐकताना डुलकी आली असे ते म्हणाले. एवढंच नाही तर मला वाटतं मुख्यमंत्र्यांना देखील कदाचित पाच-दहा मिनिटं डुलकी आली असावी अशी कोपरखळी देखील त्यांनी मारत या अंतिरिम अर्थसंकल्पावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या भाषनाची खिल्ली उडवली.

काय म्हणाले या अर्थसंकल्पावर पृथ्वीराज चव्हाण 

या अंतिरिम अर्थसंकल्पाने सर्वसामान्य, शेतकरी यांची घोर निराशा केली. या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी कोणतेच नवीन मुद्दे मांडले नाहीत. शेती उत्पन्न दुप्पट करु ही घोषणा बोगस ठरली तसेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की पाच वर्षात महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करू त्याचे काय झाले ? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. तसेच या सरकारने अहवाल महाराष्ट्राच्या जनतेला दिला पाहिजे अशी देखील त्यांनी मागणी केली. तसेच परकीय गुंतवणूक झाली, रोजगार कीती झाला याची काहीही आकडेवारी यांनी दिली नाही असा टोला देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी मांडला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -