घरमहाराष्ट्रMaharashtra Budget 2019 : आ. प्रकाश गजभियेंचे पुन्हा वेषांतर नाट्य

Maharashtra Budget 2019 : आ. प्रकाश गजभियेंचे पुन्हा वेषांतर नाट्य

Subscribe

''लाभले भाग्य आम्हास मुख्यमंत्री मराठी, विष घ्यावे लागते कर्ज माफीसाठी'' अशी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारी एक कविताही आ. प्रकाश गजभियेंनी यावेळी सादर केली.

आज विधानभवनात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला जात असताना, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये शेतकऱ्यांच्या वेशात अवतरले. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी ते खास शेतकऱ्यांचेच वेषांतर करुन आले होते. विधानभवनाबाहेर उभे राहून शेतकऱ्यांसाच्या हक्काची मागणी करताना गजभिये म्हणाले, ‘हे सरकार असवेदांनशील सरकार आहे. हे नुसतेच डिजिटल सरकार आहे. माझ्या शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे बजेट मध्ये आहे का हे पाहण्यासाठी आलो आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांच्याकरता न्याय मागण्यासाठी खास त्यांच्याच वेशात आलो आहे.’ विधानभवनाबाहेर सरकारवर ताशेरे ओढत गजभिये म्हणाले की, ‘हे सरकार म्हणायला डिजिटल सरकार आहे पण या डिजिटलायजेशनमधून शेतकऱ्यांना डावलले जाते. शेतकऱ्याची एका दिवसाची किंमत फक्त १६ रुपये इतकी आहे आणि हे योग्य नाही.’ ‘शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे, अशी मागणीही गजभिये यांनी यावेळी केली. 

‘आज मराठी भाषा गौरव दिन आहे. सगळं राज्य त्यानिमित्ताने आनंद साजरा करत आहे. मात्र, माझा गरीब शेतकरी मरत आहे. मंत्रालय हे त्यांच्या आत्महत्येचे स्थळ झाले आहे’, असेही गजभिये म्हणाले. शेतकऱ्यांना दरमहिना ५,००० रुपये पेन्शन देण्यात यावे, अशी माहणीही त्यांनी केलीय.

- Advertisement -

शेतकऱ्यांची दु:ख मांडणारी कविता

गजभियेंचे वेषांतर नाट्य

याआधीही गजभिये अनेकदा अशाप्रकारे विविध वेषांतरं करुन विधानभवनात आले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडें यांच्या वेशात अवतरले होत. तर, त्याआधी गजभिये छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश धारण करुन विधान परिषदेत आले होते. ज्यामुळे ते चांगलेच वादात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -