घरताज्या घडामोडीवारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात

वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात

Subscribe

पुण्यातील शिंदवणे येथे हा अपघात झाला असून जखमींना उपचारांसाठी रुग्णांलयात दाखल करण्यात आलं आहे.

वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात होऊन १० वारकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील शिंदवणे येथे हा अपघात झाला असून जखमींना उपचारांसाठी रुग्णांलयात दाखल करण्यात आलं आहे. (Truck Accident in satara carrying varkari)

हेही वाचा -पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा भीषण अपघात, 1 वारकरी ठार, 30 जखमी

- Advertisement -

आषाढी वारीसाठी वारकरी ट्रकमधून साताऱ्याहून आळंदीकडे जात होते. या ट्रकचा पुण्याजवळील शिंदवणे येथे ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात १० वारकरी जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातात अनिल सोमनाथ ढेरे (वय ५०), भागवत निवृत्ती शिंगारे (वय ६०), महेश भगवान (वय ६५), यशवंत भोसले (वय ७०), स्वामिनाथ गोरख पवार (वय ६५), संतोष गुलाब जगदाळे (वय ४२, रा.सर्व साखरवाडी, ता.फलटण) यांचा अपघात झाला आहे.

दरम्यान, कोरोना काळातून बाहेर पडत यंदा वारकरी पायी वारी जात आहेत. मात्र, वारीला सुरुवात होताच, गेल्या दोन दिवसांत दोन अपघात झाले आहेत. काल झालेल्या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला होता. तर, ३० वारकरी जखमी झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -