अग्निपथ भरतीसाठी अधिसूचना जारी, आठवी ते बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार करू शकतात अर्ज

अधिसूचनेत पात्रता अटी, भरती प्रक्रिया, वेतन आणि सेवा नियमांचे भत्ते यांचा तपशील देण्यात आला आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी joinindianarmy.nic.in वर जावे लागेल. अग्निपथ योजनेंतर्गत ही भरती चार वर्षांसाठी केली जाणार आहे.

new recruitment scheme for defence forces agneepath supreme court hearing today for defence forces

हवाई दलानंतर लष्करानेही सोमवारी अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अग्निवीरांच्या भरतीसाठी जुलैपासून नोंदणी सुरू होईल. अधिसूचनेनुसार, आठवी ते बारावी उत्तीर्ण तरुण यामध्ये अर्ज करू शकतात. अधिसूचनेत पात्रता अटी, भरती प्रक्रिया, वेतन आणि सेवा नियमांचे भत्ते यांचा तपशील देण्यात आला आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी joinindianarmy.nic.in वर जावे लागेल. अग्निपथ योजनेंतर्गत ही भरती चार वर्षांसाठी केली जाणार आहे. (Notice issued for Agnipath recruitment, Candidates who have passed 8th to 12th can apply)

लष्कराची अधिसूचना जारी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगळुरूमध्ये एका सभेला संबोधित करत होते. ते म्हणाले की काही सुधारणा तुम्हाला अप्रिय वाटतील, परंतु त्या दीर्घकाळासाठी देशासाठी फायदेशीर ठरतील.

अधिसूचनेनुसार, भरतीसाठी जुलैपासून नोंदणी सुरू होणार आहे. अग्निवीरला सैन्यात वेगळे पद असेल, असे लष्कराने स्पष्ट केले आहे. ते कोणत्याही विद्यमान रँकसह असणार नाही. या पाचही ग्रेडसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

असे असतील ग्रेड

अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक, अग्निवीर ट्रेड्समन (१०वी पास), अग्निवीर ट्रेड्समन (८वी पास) अशा पाच ग्रेड्समध्ये नियुक्ती करण्यात येणार आहेत.

असे आहेत निकष

जनरल पदांसाठी उमेदवार दहावीमध्ये कमीत कमी ४५ टक्क्यांनी पास असणं आवश्यक आहे.

टेक्निकल एविएशन आणि एम्युनेशन पदांसाठी फिजिक्स, केमेस्ट्री, गणित आणि इंग्रजी या विषयात बारावीमध्ये ५० टक्क्यांनी पास असणं आवश्यक आहे.

क्लर्क आणि स्टोअरकिपर पदासाठी उमेदवार कोणत्याही स्ट्रीममधून कमीतकमी ६० टक्क्यांनी बारावीमध्ये पास असणे गरजेचं आहे.

ट्रेड्समॅनच्या पदांसाठी दहावी आणि आठवी पास असणाऱ्यांसाठी वेगवेगळी भरती केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक विषयात कमीत कमी ३३ टक्के असणे गरजेचं आहे.

सर्व पदांसाठी उमेदवार १७.५ ते २३ वर्षांची वयोमर्यादा देण्यात आली आहे.

एनसीसी प्रमाणपत्र असलेल्यांना बोनस गुण मिळतील

सैन्यात भरतीसाठी, NCC A प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 5 गुण, NCC B प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 10 गुण आणि NCC C प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 15 गुण मिळतील. NCC C प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना अग्निवीर जनरल ड्युटी आणि लिपिक/स्टोअरकीपर पदांसाठी CEE (सामान्य प्रवेश परीक्षा) मधूनही सूट मिळेल.

निवृत्तीनंतर केंद्रीय नियुक्त्यांमध्ये आरक्षण

अग्निपथ योजनेविरोधातील तरुणांचा राग शांत करण्यासाठी गृह आणि संरक्षण मंत्रालयाने आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. शनिवारी सकाळी, गृह मंत्रालयाने CAPF (केंद्रीय सशस्त्र पोलीस दल) आणि आसाम रायफल्समध्ये भरतीसाठी अग्निवीरांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यांना वयोमर्यादेत ३ ते ५ वर्षे सूट देण्याची घोषणा केली.