घरमहाराष्ट्रनागपुरात खोदकामात सापडल्या ब्रिटीशकालीन तोफा

नागपुरात खोदकामात सापडल्या ब्रिटीशकालीन तोफा

Subscribe

२०० वर्षे जुन्या असून भोसले आणि इंग्रजांमध्ये झालेल्या लढाईदरम्यान भोसल्यांकडून या तोफा वापरण्यात आल्याचे सांगितले जात आहे

गुरुवारी पुन्हा एकदा कस्तुरचंद पार्कवर ब्रिटीशकालीन ऐतिहासिक दोन तोफ सापडल्याचे समोर आले आहे. महिन्याभरात ब्रिटीशकालीन तोफा सापडल्याची ही दुसरी घटना घडली आहे. नागपूर शहरात ऐतिहासिक वारसा असलेल्या कस्तुरचंद पार्कवर गुरूवारी सकाळच्या दरम्यान खोदकाम सुरू असताना पुन्हा एकदा ब्रिटीशकालीन तोफा सापडल्या आहेत. यापुर्वी १७ ऑक्टोबर रोजी येथेच चार तोफा सापडल्या होत्या.

या तोफा ब्रिटीशकालीन असून २०० वर्षे जुन्या असून भोसले आणि इंग्रजांमध्ये झालेल्या लढाईदरम्यान भोसल्यांकडून या तोफा वापरण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

येथे सापडल्या ब्रिटीशकालीन तोफा

ऐतिहासिक कस्तुकचंद पार्कवर सुरू असलेल्या वॉकिंग ट्रॅक निर्मिती आणि वृक्षारोपण सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. या सुरू असलेल्या खोदकामात पुन्हा दोन तोफा सापडल्या आहेत. या तोफा संशोधनाचा विषय असल्याचे सांगितले जात आहे. २०० वर्षांपुर्वी राजे रघुजी भोसले आणि इंग्रजांमध्ये झालेल्या ऐतिहासिक सीताबर्डी युद्धादरम्यान या तोफा वापरण्यात आल्याचा दावा केला जात आहे.


‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की….’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -